• Home
  • शैक्षणिक बातम्या
  • इस्रोमध्ये संशोधन क्षेत्रात नोकरीची संधी! JRF च्या 18 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू; अर्ज कसा आणि कुठे करायचा?
ताज्या बातम्या

इस्रोमध्ये संशोधन क्षेत्रात नोकरीची संधी! JRF च्या 18 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू; अर्ज कसा आणि कुठे करायचा?

ISRO JRF Recruitment 2026

ISRO JRF Recruitment 2026: इस्रोमध्ये संशोधनात नोकरी करण्यासाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. JRF च्या १८ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) संशोधन क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची संधी उपलब्ध झाली आहे. बेंगळुरू येथील U R Rao Satellite Centre (URSC) ने ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) पदांच्या १८ रिक्त जागांसाठी अर्ज मागवले आहेत. अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखांतील पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. (ISRO JRF Recruitment 2026)

हेही वाचा : बैठकीआधीच राजकीय स्फोट; राऊतांचा इशारा…”पक्ष तोडाल तर आम्ही तुम्हाला तोडू!”

संशोधनाची आवड असलेल्या उमेदवारांना देशातील अग्रगण्य अंतराळ संशोधन संस्थेत काम करण्याची आणि आकर्षक फेलोशिप मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

उपग्रह संशोधन केंद्रात नोकरीची संधी (Job Opportunity at Satellite Research Center)

URSC हे इस्रोचे महत्वाचे उपग्रह संशोधन व विकास केंद्र असून अनेक राष्ट्रीय अंतराळ मोहिमांमध्ये त्याचे योगदान राहिले आहे. जाहिरात क्रमांक URSC:02:2026 अंतर्गत JRF पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

विविध तांत्रिक रिक्त पदे (Various Technical Vacancies)

  • मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स
  • संगणक विज्ञान
  • माहिती तंत्रज्ञान
  • पॉवर इलेक्ट्रॉनिक्स
  • डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स
  • ऑप्टिकल इंजिनिअरिंग
  • अनुप्रयुक्त भौतिकशास्त्र
  • एरोस्पेस अभियांत्रिकी
  • गणित
  • थर्मल अभियांत्रिकी
  • मेकॅनिकल अभियांत्रिकी

पात्रता (Eligibility)

  • उमेदवारांकडे संबंधित विषयातील ME, MTech, MSc (Engineering) पदवी असणे आवश्यक आहे.
  • बहुतांश पदांसाठी किमान ६० टक्के गुण किंवा ६.५ CGPA आवश्यक आहे.
  • गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी Msc मध्ये किमान ६५ टक्के गुण मिळवलेले असावेत.
  • तसेच NET, GATE, JAM, JEST किंवा इतर मान्यताप्राप्त राष्ट्रीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा (Age Limit)

  • ११ जुलै २०२६ या तारखेपर्यंत उमेदवाराचे वय २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • शासनाच्या नियमानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया (Selection Process)

  • अर्जदारांची प्रथम शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे छाननी केली जाईल.
  • त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • अंतिम निवड ही मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे केली जाईल.

फेलोशिप आणि इतर सुविधा (Fellowship And Other Facilities)

  • निवड झालेल्या JRF उमेदवारांना दरमहा ३७ हजार फेलोशिप दिली जाईल.
  • पुढे वरिष्ठ संशोधन फेलो (SRF) पदावर प्रमोशन मिळाल्यास ही रक्कम ४२ हजार पर्यत वाढू शकते.
  • याशिवाय घरभाडे भत्ता आणि वैद्यकीय सुविधा देखील मिळतील.

अर्ज प्रक्रिया (Application Process)

  • इच्छुक उमेदवारांनी इस्रोच्या https://www.isro.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावरील करिअर विभागातून ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्ज करताना फोटो, स्वाक्षरी, शैक्षणिक कागदपत्रे तसेच NET/GATE किंवा संबंधित परीक्षांचे गुणपत्रक अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची PDF प्रत किंवा प्रिंटआउट जतन करून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts