Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट कोंकणी घावणे; आजच घरी बनवा, रेसिपी नोट करा
ताज्या बातम्या

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट कोंकणी घावणे; आजच घरी बनवा, रेसिपी नोट करा

Ghavan Recipe

Ghavan Recipe: तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी वेगळे खायचे आहे का? मग आजच बनवा कोंकणी स्पेशल घावणे. हा हलका, पौष्टिक आणि पटकन तयार होणारा पदार्थ आहे. मग वाट कसली पाहता? लगेच ही सोपी रेसिपी नोट करा.

सकाळच्या नाश्त्यात रोजच्या पोहे-उपमा किंवा ब्रेडच्या पर्यायाला कंटाळा आला असेल, तर आता काहीतरी पारंपरिक हलकं आणि तरीही पौष्टिक करून पाहण्याची वेळ आली आहे. कोंकणातील घराघरात बनणार खास पदार्थ म्हणजे घावणे (Ghavan). तांदळापासून तयार होणारा हा अतिशय साधा पदार्थ कमी वेळात तयार होतो, पचायला हलका असतो आणि चवीला देखील अप्रतिम लागतो. नारळाची चटणी,गूळ- खोबरे किंवा सांबारसोबत याची चव आणखी खुलते. त्यामुळे सकाळचा नाश्ता हेल्दी आणि स्वादिष्ट बनवायचा असेल तर ही सोप रेसिपी नक्की ट्राय करा.

हेही वाचा: कॅफे-स्टाईल सकाळी नाश्ता हवाय? घरच्या घरी आजच बनवा चविष्ट फ्रेंच टोस्ट, सोपी आहे रेसिपी

साहित्य

तांदूळ (भिजवलेले)
किसलेले खोबरे (ऐच्छिक)
मीठ चवीनुसार
पाणी
तेल (तव्यावर लावण्यासाठी)

कृती

भिजवलेले तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पातळ पीठ तयार करा.
चवीनुसार मीठ घाला आणि मिश्रण चांगले ढवळा.
तवा गरम करून हलकं तेल लावा.
पीठ तव्यावर पातळ पसरवा आणि झाकण ठेवून शिजू द्या.
दोन्ही बाजूंनी हलकं सोनेरी रंग येईपर्यंत शिजवा.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts