मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु झाल्यापासूनच विरोधकांनी या योजनेवर टीकास्त्र सोडले होते. हे सर्व टीकास्त्र मोडून ही योजना अजूनही सुरूच आहे. या योजनेबाबत सरकार निवडून आल्यावर योजना बंद पडेल असे सांगण्यात आले होते. परंतु असे काहीही झाले नसून ही योजना अजूनही सुरु आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना ई–केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. परंतु ही प्रक्रिया पूर्ण करत असताना अनेक लाभार्थी महिलांना अडचणी येत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना केवायसीसाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. हा कालावधी संपल्यानंतर ज्या महिला ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाही, त्यांना लाडकी बहिण योजनेचा हप्ता मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. यावर आता अजित पवार यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
ऑगस्टमध्ये लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली होती. सुरुवातीला या योजनेत शिथिलता देण्यात आली. परंतु आता लाडक्या बहिणीचा लाभ फक्त पात्र बहिणींनाच मिळणार आहे. त्यासाठी आपण केवायसी करून घेत आहे. यासाठी आपण मुदत वाढ करू, परंतु केवायसी करावीच लागणार असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
काही योजना चालू असतात, त्या कायम चालतात, असं नाही. त्या-त्या वेळची परिस्थिती लक्षात घेऊन काही बदल करण्यात येतात. आता आनंदाचा शिधा ठराविक लोकांना मिळत होता, लाडकी बहीण योजनेचे पैसे जास्त लोकांना मिळतात. सगळ्या योजनांबाबत महायुती सरकार सकारात्मक असून काही योजना आल्यावर त्याचे उद्दिष्ट साध्य होत नसेल तर त्यामध्ये आपण बदल करतो. त्यानुसार आम्ही मार्ग काढत आहोत, असे अजित पवार म्हणाले.