• Home
  • राजकारण
  • महाडमध्ये पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांची तडकाफडकी बदली, तडवी मोबाईल बंद करून गायब
Top News

महाडमध्ये पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांची तडकाफडकी बदली, तडवी मोबाईल बंद करून गायब

Ramesh Tadvi transferred

Ramesh Tadvi transferred : महाड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या तडकाफडकी बदलीनंतर शहरात चर्चांना उधाण आले आहे. बदलीच्या पार्श्वभूमीवर ते मोबाईल बंद करून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्यांच्या चालकाने चावी घेऊन घरी जाऊन कुटुंबीयांना माहिती दिली की साहेबांनी पोलीस स्टेशनमधून मोबाईल बंद केला असून ते कुठेतरी निघून गेले आहेत.

हेही वाचा – मुस्लिम समाजाला दिलेलं 5 टक्के आरक्षण रद्द; सरकारच्या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल

महाड शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक रमेश तडवी दिवसभर घरी होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे कामावर गेले. काही कागदपत्रांची गरज असल्याने त्यांनी एका व्यक्तीला घरी पाठवले आणि स्वतःही लगेच घरी येतो असे सांगितले. मात्र त्यानंतर ते घरी परतले नाहीत.

तडवी यांच्या पत्नीने गंभीर आरोप

तडवी यांच्या पत्नीने गंभीर आरोप करत सांगितले की, त्यांच्या पतीची नुकतीच बदली करण्यात आली आहे. यापूर्वीही बदलीविरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती आणि मोठ्या मानसिक तणावातून ते बाहेर आले होते. एका वर्षानंतर पुन्हा बदली कशी करण्यात आली? कोणतीही नोटीस न देता इतक्या घाईत बदली का करण्यात आली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

रमेश तडवी हे नक्की कुठे गेले आणि का गेले

या संपूर्ण प्रकरणामुळे महाडमध्ये विविध चर्चांना उधाण आले असून, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अधिकृत खुलासा अद्याप न मिळाल्याने रमेश तडवी हे नक्की कुठे गेले आणि का गेले नेमकं कारण गुलदस्त्यात असल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts