Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • मोठी दुर्घटना! नागपुरमधील कंपनीत भीषण स्फोट, 15 कामगारांचा मृत्यू
ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना! नागपुरमधील कंपनीत भीषण स्फोट, 15 कामगारांचा मृत्यू

Nagpur SBL Factory Blast | नागपुरमध्ये (Nagpur) एक मोठी दुर्घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे स्फोटकं बनवणारी एक कंपनी होती. या कंपनीत भीषण स्फोट (Blast) झाला असून या दुर्घटनेत 15 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 18 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमी कामगारांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा – अजित पवार विमान अपघात, DGCA च्या प्राथमिक अहवालातून नवे खुलासे समोर

नागपुरच्या बारूद कंपनीत भीषण स्फोट

मिळालेल्या माहितीनुसार, राऊळगाव येथील बारूद कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात कंपनीत काम करणाऱ्या 15 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना आज सकाळी (1 मार्च) 7 वाजताच्या सुमारास घडली आहे. तर या घटनेत अनेक कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीनं नागपुरमध्ये हलवण्यात आले आहे.

कंपनीत स्फोट झाल्यानंतर भीषण आग लागली होती. त्यानंतर या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली होती. तर सध्या अग्निशमन दल आणि बचाव पथकाडून घटनास्थळी मतदकार्य सुरू आहे.

दरम्यान, या स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. त्यामुळे सध्या पुढील तपास सुरू असून या घटनेची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे. तसेच त्यांनी तात्काळ मदत करण्याचे निर्देश दिले आहे.

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts