Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • मोठी बातमी! इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेईंचा मृत्यू, मीडियाने केली पुष्टी
Top News

मोठी बातमी! इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेईंचा मृत्यू, मीडियाने केली पुष्टी

Iran’s Supreme Leader Ayatollah Ali Khameneni Dies | नुकतीच एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. इराणचे (Iran) सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Supreme Leader Ayatollah Ali Khameneni) यांचा मृत्यू झाला आहे. इस्त्रायल (Israel) आणि अमेरिकेच्या (America) हवाई हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती इराणच्या अधिकृत प्रेस टीव्हीने दिली आहे.

हेही वाचा – इस्रायल-इराण युद्धाची झळ भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार? काय होऊ शकतो परिणाम

तेहरानमधील अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निवसस्थानावर झालेल्या भीषण बॉम्बफेकीत त्यांचा मृत्यू झाला आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये शोककळा पसरली असून इराण सरकारने संपूर्ण देशात 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक घोषित केला आहे. सोबतच 7 दिवसांसाठी सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे.

काही तासांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर अयातुल्ला अली खामेनेई मारले गेल्याची घोषणा केली होती. या बातमीवर आता शिक्कामोर्त झाले असून इराणमध्ये अनेक ठिकाणी लष्करी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणच्या सरकारी इमारतींना टार्गेट करण्यात आले होते. यामध्ये खामेनेई यांच्या घरावर आणि कार्यालयावरही हवाई हल्ले करण्यात आले होते. यामध्ये खामेनेई यांच्यासह त्यांची मुलगी, जावई, सून, नातू आणि घरात उपस्थित असलेले इतर नातेवाईक या सर्वांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts