• Home
  • राजकारण
  • अजित पवार विमान अपघात, DGCA च्या प्राथमिक अहवालातून नवे खुलासे समोर 
Top News

अजित पवार विमान अपघात, DGCA च्या प्राथमिक अहवालातून नवे खुलासे समोर 

DGCA report
DGCA report : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला एक महिना पूर्ण झाला असून, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या प्रकरणाचा 22 पानांचा प्राथमिक तपास अहवाल जाहीर केला आहे. या अहवालातून अपघाताच्या वेळची परिस्थिती आणि तांत्रिक बाबींबाबत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

झाडाला पहिली धडक

 विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वी ते एका मोठ्या झाडावर आदळले होते. त्यानंतर विमानाने नियंत्रण गमावले आणि ते जमिनीवर कोसळले.

कमी दृश्यमानता

बारामती विमानतळावर लँडिंगसाठी किमान 5000 मीटर दृश्यमानता आवश्यक असताना, अपघातावेळी ती केवळ 2000 ते 3000 मीटर इतकीच होती. धुक्यामुळे वैमानिकांना धावपट्टीचा अंदाज घेण्यात अडचण आली असावी, असा अंदाज आहे.

FDR आणि CVR डॅमेज

अपघातानंतर लागलेल्या भीषण आगीमुळे ‘फ्लाईट डेटा रेकॉर्डर’ (FDR) उष्णतेने खराब झाला आहे. कॉकपीटमधील संभाषणाचा डेटा (CVR) सुरक्षितपणे काढण्यासाठी आता अमेरिकेतील तज्ज्ञ कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. ब्लॅक बॉक्समधील डेटा मिळवण्यासाठी अमेरिकन विशेष टीम भारतात येणार आहे. या ‘रॉ डेटा’चे तांत्रिक विश्लेषण पूर्ण झाल्यावरच अंतिम अहवाल समोर येईल, ज्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

धावपट्टीच्या त्रुटी

बारामतीचे एअरफिल्ड ‘अनकंट्रोल्ड’ श्रेणीत येते. तेथील रनवे मार्किंग फिकट असणे आणि ‘टेबल-टॉप’ रनवे असणे हे घटकही अपघाताला कारणीभूत ठरल्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे.

वैमानिकाचा शेवटचा संदेश

विमान कोसळण्यापूर्वी वैमानिकाने रेडिओवर अत्यंत भीतीदायक शेवटचा संदेश दिला होता, ज्यातून अचानक नियंत्रण सुटल्याचे संकेत मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts