Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • अजित पवार विमान अपघाताबाबत रोहित पवारांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, “VSR च्या मालकानं ब्लॅक बॉक्समधील…”
Top News

अजित पवार विमान अपघाताबाबत रोहित पवारांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, “VSR च्या मालकानं ब्लॅक बॉक्समधील…”

rohit pawar 4

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash | राज्याचे माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाताला आता महिना उलटून गेला असून अद्यापही त्यांच्या अपघाताबाबत नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. अजित पवारांचा अपघात (Ajit Pawar Plane Crash) होता की घातपात? असा सवाल निर्माण होताना दिसत आहे. तर या प्रकरणाबाबत सीआयडीकडून (CID) कसून तपास केला जात आहे. दुसरीकडे, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे अजित पवारांच्या अपघाताबाबत दररोज नवनवीन खुलासे करताना दिसत आहेत. आता रोहित पवारांनी धक्कादायक खुलासा केला आहे ज्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – पुण्यातील नवले पूल पुन्हा रक्ताने माखला, भीषण अपघातात एकाचा मृत्यू

ब्लॅक बॉक्सबाबत नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. या ब्लॅक बॉक्समधील माहितीशी छेडछाड केली जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे.

रोहित पवारांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, फेरफार करण्यात अत्यंत सराईत असलेला VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग सद्यस्थितीला आपल्या मर्जीतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून FDR (black box चा एक भाग ज्यामध्ये विमानांची सर्व तांत्रिक माहिती रेकॉर्ड झालेली असते) मधील एडिट करत असल्याची माहिती मिळाली आहे, असं रोहित पवारांनी सांगितलं.

रोहित पवारांनी दिला थेट इशारा

DGCA किंवा AAIB मधील जे कुणी या कामात मदत करत असतील किंवा करणार असतील त्यांनी forensic audit मध्ये हा फेरफार पकडला जाईल, याची नोंद असू द्यावी. उद्या आम्ही संसदेच्या माध्यमातून समिती स्थापन केल्यानंतर आणि त्यात forensic audit झाले जे होणारच आहे तेव्हा VSR कंपनीला वाचवायला कुणीही येणार नाही. तसंच DGCA मध्ये अनेक अधिकारी प्रामाणिक देखील आहेत हेही लक्षात असू द्यावं, असा इशाराही रोहित पवारांनी दिला आहे.

रोहित पवार हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते अजित पवारांच्या अपघात प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी ते मोठ्या नेत्यांची भेट घेत आहेत. यामध्ये त्यांनी सोनिया गांधी, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव अशा मोठ्या नेत्यांची भेट घेतली आहे.

दरम्यान, मागच्या महिन्यापासून आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दोनदा पत्रकार परिषद घेत या अपघात प्रकरणाशी निगडीत काही पुरावे सादर करत संशय व्यक्त केला आहे. तसेच आताही या प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक झाले असून त्यांनी व्हीएसआर (VSR) कंपनीच्या मालकावर गंभीर आरोप केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts