• Home
  • देश
  • यूएईच्या राज्यमंत्री अमेरिकेवर संतापल्या, थेट दिला इशारा; म्हणाल्या, “इराणवर हल्ला करण्यासाठी आमची जमीन…”
Top News

यूएईच्या राज्यमंत्री अमेरिकेवर संतापल्या, थेट दिला इशारा; म्हणाल्या, “इराणवर हल्ला करण्यासाठी आमची जमीन…”

iran 6

US-Iran War | सध्या अमेरिका (US) आणि इराणमध्ये (Iran) तणावाचे वातावरण असून दोन्ही देशांकडून एकमेकांवर जोरदार हल्ला केला जात आहे. या युद्धादरम्यान संयुक्त अरब अमिरातीने (UAE) अमेरिकेवर संताप व्यक्त करत आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. संयुक्त अरब अमिरात अमेरिकेला आपली जमीन वापरू देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका यूएईच्या राज्यमंत्री लाना नुसेबेहर यांनी मांडली आहे.

हेही वाचा – जहाज घेऊन जायचंय तर आमच्या नौदलाशी…”, होर्मुझ सामुद्रधुनीबाबत इराणची मोठी घोषणा

इराणच्या हल्ल्यांबाबत काय म्हणाल्या यूएईच्या राज्यमंत्री?

इराण-अमेरिकेच्या युद्धावर यूएईच्या राज्यमंत्री लाना नुसेबेह यांनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, आखाती देशांवर झालेले हल्ले हे बेकायदेशीर आहेत. कारण कोणतंही कारण नसताना हे हल्ले केले गेले आहेत. या हल्ल्यांना कसलीही मर्यादा राहिलेली नाहीये. तसेच इराणने या संपूर्ण भागाला युद्धात ओढून घेतले आहे.

आखातात असलेल्या देशांवरील हल्ले इराणने थांबवायला पाहिजेत. इराणने केलेल्या हल्ल्यामुळे यूएईतील प्रसिद्ध हॉटेल्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या हल्ल्यात यूएईने आत्तापर्यंत इराणचे 1800 ड्रोन्स आणि मिसाईल्स हवेत नष्ट केल्या आहेत, अशी माहिती लाना नुसेबेह यांनी दिली.

यूएईने अमेरिकेला हवाई हद्द वापरण्यास केली मनाई

पुढे नुसेबेह यांनी अमेरिकेवर भाष्य केलं. इराणने केलेल्या हल्ल्यांमुळे आमचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पण स्वत:चे संरक्षण करण्याचा अधिकार यूएईला आहे. तसेच इराणवर हल्ले करण्यासाठी अमेरिकेला यूएई आपली जमीन किवा हवाई हद्द वापरू देणार नाही, असं नुसेबेह यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच यूएईची अर्थव्यवस्था मजबूत आहे, त्यामुळे आम्ही पर्यटन उद्योगावर आणि तेलाच्या ठिकाणांवर झालेले हल्ले सहन करू शकतो, असंही नुसेबेह यांनी सांगितलं.

इराणने युद्ध सुरू झाल्यापासून अनेक देशांवर हल्ले केले आहेत. यामध्ये यूएईसह, सौदी अरेबिया, कुवैत, कतार, ओमान या देशांमधील अनेक ठिकाणांवर इराणने हल्ले केले आहेत, ज्याचा देशांना मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, इराणमध्ये युद्ध सुरू असताना अमेरिकेचे KC-135 रिफ्युलिंग विमान कोसळले आहे. या विमान अपघातात पाच क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याची माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिली आहे.

या अपघाताबाबत अमेरिकेच्या लष्कराने सांगितले की, आमची दोन KC-135 रिफ्युलिंग विमाने होती. त्यापैकी एक विमान सुरक्षितरित्या लँड झाले असून दुसरे विमान कोसळून त्याचा अपघात झाला आहे. हा अपघात शत्रूने केलेल्या हल्ल्यामुळे झाला आहे. ही घटना ऑपरेशन एपिक फ्युरीच्या दरम्यान मित्र राष्ट्राच्या हद्दीत घडली आहे. तसेच या अपघातानंतर बचाव कार्य सुरू असून पुढील तपास केला जात आहे, अशी माहिती अमेरिकेच्या लष्कराने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts