• Home
  • राजकारण
  • VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाला अटक होणार? अजित पवार अपघात प्रकरणी जय पवारांचा खळबळजनक दावा, दिले मोठे संकेत
Top News

VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाला अटक होणार? अजित पवार अपघात प्रकरणी जय पवारांचा खळबळजनक दावा, दिले मोठे संकेत

jay pawar

Jay Pawar On Rohit Singh | राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं विमान अपघातात दु:खद निधन झालं आहे. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवारांचा विमान अपघातात (Ajit Pawar Plane Crash) मृत्यू झाला. तर त्यांच्या विमान अपघातावरून अजूनही शंका व्यक्त केली जात आहे. अजित पवारांचा खरंच अपघात होता की घातपात होता? असा सवाल अजूनही निर्माण केला जात आहे. तर या प्रकरणाचा संपूर्ण तपास CID कडे सोपवण्यात आला आहे. अशातच आता अजित पवार यांचे पुत्र जय पवार (Jay Pawar) यांनी खळबळजनक दावा केला आहे.

हेही वाचा – “सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर आम्हाला…”, बारामतीत मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

रोहित सिंगला अटक होणार?

मागील काही दिवसांपासून आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवारांचा घातपात असल्याचा दावा करत काही पुरावे सादर केले आहेत. तर राष्ट्रवादीतील (NCP) अनेक नेत्यांनी देखील तीच भूमिका मांडली आहे. रोहित पवारांनी व्हिएसआर (VSR) कंपीनचा मालक व्ही.के.सिंग (V.K.Singh) आणि त्याचा मुलगा रोहित सिंगवर (Rohit Singh) गंभीर आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. अशातच आता जय पवार यांनी देखील रोहित सिंगला अटक होणार असल्याचा मोठा दावा केला आहे. तसेच त्यांनी काही संकेत देखील दिले आहेत.

नेमकं काय म्हणाले जय पवार?

अजित पवारांच्या अपघात प्रकरणी व्ही.के.सिंगचा मुलगा रोहित सिंगला अटक करावी, अशी मागणी जय पवार यांनी केली आहे. आज बारामतीमध्ये पोटनिवडणूसाठी मतदान सुरू आहे. तर मतदान केल्यानंतर जय पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अजित दादांच्या अपघाताचा संपूर्ण तपास सीआयडीकडून केला जात आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन आठवड्यांमध्ये सर्व चित्र समोर येईल, असे संकेत जय पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, 5 मार्च 2026 रोजी अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही.के.सिंग आणि त्यांचा मुलगा रोहित सिंगची चौकशी सीआयडीकडून करण्यात आली होती. या दोघांची जवळपास 9 तास चौकशी करण्यातआ आली होती. अशातच आता जय पवार यांनी रोहित सिंग यांच्या अटकेची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts