• Home
  • राजकारण
  • “सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर आम्हाला…”, बारामतीत मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य
Top News

“सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर आम्हाला…”, बारामतीत मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

pawar pawar

Supriya Sule On Sunetra Pawar | आज (23 एप्रिल) महाराष्ट्रात (Maharashtra) दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत असून, दोन्ही ठिकाणी मतदान सुरू आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर बारामतीची (Baramati) जागा रिक्त झाली असून या जागेसाठी आज मतदान पार पडत आहे. तर बारामतीतून या जागेसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या निवडणूक लढवत असून त्या आमदार होण्याच्या तयारीत आहेत. मात्र, या निवडणूकीत सुनेत्रा पवारांना 23 अपक्ष उमेदवारांनी आव्हान दिले आहे.

हेही वाचा – कुठे उन्हाचा तडाखा, कुठे पावसाची सर; 12 राज्यांत वादळी पावसाचा इशारा, यलो अलर्ट जाहीर

बारामतीत आज पोटनिवडणूकीसाठी (Baramati By-election) मतदान पार पडत आहे. या मतदानासाठी आज सकाळपासूनच बारामतीकरांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच आता सुप्रिया सुळे यांनी देखील मतदान केले आहे. तर मतदानानंतर सुप्रिया सुळेंनी (Sunetra Pawar) सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

शरद पवार मतदानासाठी का नाही आले? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्टीकरण

बारामतीमध्ये मतदान केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “एका मजबूत लोकशाहीत प्रत्येकाने मतदान केले पाहिजे आणि म्हणूनच आम्ही मतदानासाठी आलो आहोत. शरद पवार यांना काही चाचण्या करायच्या असल्यामुळे आणि त्यांना डॉक्टरांनी प्रवास न करण्याचा सल्ला दिल्याने ते मतदान करू शकले नाहीत, अशी माहिती सुप्रिया सुळेंनी दिली.

सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होण्याबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

पुढे त्या म्हणाल्या की, “आम्ही आज आमचा भाऊ गमावला आहे, त्यामुळे मला दुःख होत आहे. पण सुनेत्रा पवार चांगल्या बहुमताने ही निवडणूक जिंकतील. आम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला आहे आणि आता पुढे कोणतीही मोठी लढाई नाही, अस सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं.

सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवार या भविष्यात नक्कीच मुख्यमंत्री होतील, असं मोठं वक्तव्य केलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे यांनी केलेल्या विधानाचे मी मनापासून स्वागत करते की, सुनेत्रा पवार एक दिवस राज्याच्या मुख्यमंत्री होतील. सुनेत्राजी पवार राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या तर आम्हा सर्वांना खूप आनंद होईल, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts