Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • भविष्य
  • लक्ष्मीची विशेष कृपा! आजचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरू शकतो गेम-चेंजर; जाणून घ्या तुमचं राशिभविष्य
ताज्या बातम्या

लक्ष्मीची विशेष कृपा! आजचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरू शकतो गेम-चेंजर; जाणून घ्या तुमचं राशिभविष्य

horoscope

Navratri Shashti Horoscope 2026: नवरात्रीच्या षष्ठीच्या दिवशी रोहिणी नक्षत्राचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. या खास दिवशी काही राशींवर लक्ष्मीची विशेष कृपा होणार आहे, तर काहींनी सावध राहण्याची गरज आहे.

आज काही राशींना धनलाभ आणि करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल, तर काहींना खर्च वाढणे आणि महत्वाचे निर्णय घेताना काळजी घ्यावी लागेल. आज दुपारी ३ वाजून ३१ मिनिट ते ७ वाजून २ मिनिटांपर्यंत राहुकाळ असणार आहे. यावेळेत नवीन काम सुरु करणे टाळा, कारण चुकीचा निर्णय संपूर्ण दिवसावर परिमाण करू शकतो. आजचा दिवशी साधा नाही. काही लोकांसाठी अचानक आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचे योग आहेत, तर काहींसाठी एक छोटी चूक मोठ्या नुकसानीत बदलू शकते.

हेही वाचा: Love Horoscope: आज २३ मार्च! प्रेमात गोडवा की तणाव? वाचा तुमचं राशिभविष्य

नवरात्री षष्ठीच्या दिवशी माता कात्यायनीची कृपा आणि वृषभ राशीत उच्च स्थितीत असलेला चंद्र यामुळे आज भाग्य वेगाने बदलू शकते. पण त्याचवेळी तुमची परीक्षा देखील घेऊ शकते. जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की आज तुमच्या राशीसाठी नोकरी, प्रेम, पैसे आणि आरोग्याच्या बाबतीत काय खास घडणार आहे, तर मेष ते मीनपर्यंत संपूर्ण राशिभविष्य नक्की वाचा.

मेष

आज तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या मजबूत दिवस आहे. करिअरमध्ये तुमची मेहनत दिसून येईल आणि वरिष्ठांकडून मान्यता मिळेल. धनप्राप्तीचे योग आहेत, विशेषतः जर तुम्ही व्यापारात असाल तर प्रेमसंबंधात स्पष्ट संवाद फायदेशीर ठरेल. आरोग्य ठीक असले तरी घसा आणि कफ याची काळजी घ्या.

वृषभ

आज चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे तुमचा प्रभाव खूप वाढेल. तुमची उपस्थिती आणि निर्णयक्षमता लोकांना आकर्षित करेल. आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा किंवा गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. नातेसंबंधात स्थैर्य आणि आनंद राहील.

मिथुन

आजचा दिवस अंतर्मुख करणारा आहे. खर्च वाढण्याची शक्यता असल्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक आहे. करिअरमध्ये परदेश किंवा डिजिटल माध्यमातून संधी मिळू शकते. नात्यांमध्ये संवाद कमी झाल्यास गैरसमज निर्माण होऊ शकतात.

कर्क

आज तुम्ही सर्वात भाग्यवान राशींमध्ये आहात. आर्थिक लाभ, नवीन संधी आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मित्र आणि नेटवर्किंगमुळे मोठे फायदे मिळू शकतात. प्रेमसंबंधात सकारात्मकता राहील.

सिंह

करिअरच्या दृष्टीने आज महत्त्वाचा दिवस आहे. तुमच्यावर मोठी जबाबदारी येऊ शकते जी भविष्यात प्रगतीचे दार उघडेल. आर्थिकदृष्ट्या स्थिरता राहील. नात्यांमध्ये थोडा तणाव संभवतो.

कन्या

भाग्य आज तुमच्या बाजूने आहे. शिक्षण, परदेशी काम किंवा नवीन कौशल्य शिकण्यासाठी योग्य वेळ. आर्थिक स्थिती सुधारेल, पण मोठा लाभ हळूहळू मिळेल. आध्यात्मिक झुकाव वाढेल.

तूळ

आज सावध राहण्याचा दिवस आहे. गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. करिअरमध्ये गुप्तता ठेवणे फायदेशीर ठरेल. भावनिक चढउतार जाणवतील.

वृश्चिक

आज नातेसंबंध आणि पार्टनरशिपसाठी उत्तम दिवस आहे. व्यवसायात भागीदारीतून मोठा फायदा मिळू शकतो. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. आर्थिकदृष्ट्या प्रगती.

 

धनु

आज मेहनतीचा दिवस आहे. तुम्ही केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळेल, पण थोडा ताण जाणवू शकतो. उधारीचे पैसे परत मिळण्याची शक्यता. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

 

मकर

आज सर्जनशीलतेचा आणि बुद्धिमत्तेचा दिवस आहे. गुंतवणूक आणि योजना यशस्वी ठरू शकतात. प्रेमसंबंधात स्थिरता आणि समजूत. कुटुंबाकडून आनंदाची बातमी मिळू शकते.

कुंभ

आज घर आणि कुटुंब महत्त्वाचे ठरेल. प्रॉपर्टी, वाहन किंवा घराशी संबंधित निर्णय शक्य. मानसिक शांतता मिळेल, पण जास्त विचार टाळा. आर्थिकदृष्ट्या खर्च वाढू शकतो.

मीन

आज तुमची संवादकौशल्ये तुम्हाला पुढे नेतील. मार्केटिंग, मीडिया किंवा कम्युनिकेशन क्षेत्रात यश. लहान प्रवास फायदेशीर ठरतील. नवीन ओळखी निर्माण होतील.

 

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts