Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • अभिनेत्री समंथा रूथ प्रभूने फॅमिली मॅन च्या दिग्दर्शकाशी बांधली लग्नगाठ
ताज्या बातम्या

अभिनेत्री समंथा रूथ प्रभूने फॅमिली मॅन च्या दिग्दर्शकाशी बांधली लग्नगाठ

Samantha Ruth Prabhu and Raj Nidimoru during their wedding ceremony

Samantha Ruth Prabhu marriage : अभिनेत्री समंथा रूथ प्रभू ने गुपचूप लग्नगाठ बांधल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आजची दिनांक 1-12-2025 असे नमूद करण्यात आले असून तिने दिग्दर्शक राज निडिमोरु यांच्याशी लग्न केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर फोटोस शेअर केले असून चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अभिनेत्रीमंथा प्रभू आणि दिग्दर्शक राज निडिमोरु हे लग्न करणार असल्याच्या चर्चांना काही दिवसांपासून उधाण आले होते. त्यानंतर त्यानंतर आज त्यांनी अचानक लग्न करून इंस्टाग्राम वर पारंपारिक विवाहसोहळ्याचे फोटो शेअर केले आहे. या इंस्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये 01.12.2025 अशी आजची तारीख टाकून खास क्षण टिपला आहे. या पोस्ट वर चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

हे ही वाचा : 49 व्या वर्षी हा अभिनेता बनणार बाबा; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा

हा विवाह सोहळा साध्या,पारंपारिक, आणि खाजगी पद्धतीने पार पडला. या लग्नसमारंभात समंथा लाल आणि सोनेरी पारंपरिक साडीत दिसली. हि साडी तिच्यावर प्रचंड खुलून दिसत होती. तर राज निडिमोरु याने ऑफ व्हाईट रंगाच्या कुर्ता पायजमा आणि बेज रंगाचे जॅकेट परिधान केल्याचे दिसले. त्यांनी शेरा केलेल्या फोटोस मध्ये समंथा हातात अंगठी घालताना दिसत असून दुसऱ्या फोटोत लिंग भैरवी देवीचा आशीर्वाद घेताना तरका फोटोत समंथा राजला मिठी मारताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

2024 पासून होते एकत्र

समंथा ने 2017 साली नागा चैतन्य सोबत विवाह केला होता. परंतु त्यांचा 2021 मध्ये घटस्फोट झाला. तर राज निडिमोरु यांचा श्यामली डे यांच्याशी विवाह झाला होता. 2024 या वर्षी दोघेजण बऱ्याचदा एकत्र दिसले. तेव्हापासून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगली होती.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts