Sheetal Mhatre Attack on Ganesh Naik : राज्य सरकारमध्ये महायुती म्हणून एकत्र संसार करणाऱ्या शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये महापालिकानंतर मोठी धुसफूस पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर जबरी टीका केली होती. त्यावर, शिंदे सेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र, आता पुन्हा एकदा गणेश नाईक यांनी शिंदेंवर जहरी टीका केल्याने शिंदे सेनेच्या नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येतं. त्याला शिंदे सेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंनी गणेश नाईक यांच्यावर जहरी टीका केलीय. असे ५६ गणेश नाईक एकत्र आले तरी शिंदे साहेबांचे काही वाकडं करू शकणार नाहीत, अशा शब्दात म्हात्रेंनी पलटवार केला. त्यामुळे शिंदे सेना आणि भाजप यांच्या महायुतील वाद चव्हाट्यावर आलाय.
हेही वाचा – ‘….तर नामोनिशाण संपवून टाकू’ वनमंत्री गणेश नाईकांनी साधला उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंवर निशाणा
राजकारणात कोणीच कोणाला कमी नसते, एखाद्याला संपवायची भाषा केली तर बाकीचे हाताची घडी पाडून बसत नाहीत. वेळ आल्यावर आम्ही सुद्धा आमची भूमिका घेणार, अशी भूमिका शिंदे सेनेच्या नेत्यांनी घेतली होती. आज दिवंगत नेते आनंद दिघेच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आम्ही जमलो आहोत, गट स्थापनेसाठी आम्ही उद्या कोकण भवनला जाणार आहोत, अशी माहिती शिवसेना महिला प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी दिली. तसेच, मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेवरुन जोरदार पलटवार केलाय.
भाजप नेत्यांनी नाईकांना समज द्यावी – शीतल म्हात्रे
गणेश नाईक यांना शेवटचे सांगणे आहे, ‘यापुढे जर एकनाथ शिंदेंबाबत एक शब्द जरी काढला तरी महिला आघाडी तुम्हाला धडा शिकवेल, या आधी त्यांनी अनेक विधानं केली, निवडणुकांनंतर अशी विधानं थांबणे अपेक्षित असताना नाईक बेताल वक्तव्य करत आहेत. त्यामुळे, भाजपच्या शिरस्त नेत्यांनी नाईकांना समज द्यावी,’ अशी मागणी शीतल म्हात्रे यांनी केली.
गणेश नाईकांना नवी मुंबईशिवाय कोण ओळखतं?
गणेश नाईकांना नवी मुंबईशिवाय कोण ओळखतं? स्वत्तः तीन वेळा पडलेत, मुलं पडलेत, नाईकांनी टिका करताना याचा विचार करावा, असेही त्यांनी म्हटलंय. गणेश नाईकांपासून महिला लांब का पळतात, नाईकांवर कुठले गुन्हे आहेत हे बोलायला लावू नका, असा सवालही म्हात्रेंनी उपस्थित केला. तसेच, एकनाथ शिंदेंचे नामोनिशाण मिटवणारा माई का लाल अजून पैदा झालेला नाही. असे ५६ गणेश नाईक एकत्र आले तरी शिंदे साहेबांचे काही वाकडं करू शकणार नाहीत, अशा शब्दात म्हात्रेंनी पलटवार केला.












