Watermelon Seeds Benefits | सध्या कडक उन्हाळ्याचे (Summer) दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे या दिवसांमध्ये शरीराला थंडावा मिळण्यासाठी लोकं मोठ्या प्रमाणात कलिंगड (Watermelon) खात असतात. कलिंगड हे फळ शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळे बरेच लोक कलिंगड मोठ्या प्रमाणात खाताना दिसतात. कलिंगड खाताना बहुतांश लोक त्याच्या बिया कचरा समजून फेकून देतात. पण तुम्हाला माहिती आहे का, या छोट्या बियांमध्ये अनेक पोषक घटक लपलेले असतात, जे विशेषतः पुरुषांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात? प्रथिने, मॅग्नेशियम, झिंक आणि हेल्दी फॅट्सने भरलेल्या कलिंगडाच्या बिया (Watermelon Seeds) शरीराची ताकद वाढवण्यास आणि एकूण आरोग्य सुधारण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया या बियांचे खास फायदे आणि त्या खाण्याची योग्य पद्धत.
हेही वाचा – आरोग्यासाठी सुपरफूड ठरतो आवळा! आहारात समाविष्ट करण्याचे फायदे जाणून घ्या
कलिंगडच्या बियांचे शरीराला कोणते फायदे होतात?
1. कलिंगडच्या बियांमध्ये मॅग्नेशियमचा स्त्रोत असतो. त्यामुळे कलिंगडच्या बियांमधून पुरूषांच्या शरीराला मॅग्नेशियम मिळण्यास मदत होते. तसेच या बियांमुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
2. कलिंगडच्या बियांमध्ये झिंकचा उत्तम स्त्रोत आहे. झिंकमुळे पुरूषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता वाढण्यास मदत होते. तसेच पुरूषांमधील ‘टेस्टोस्टेरॉन’ची पातळी राखण्यासाठी कलिंगडच्या बिया उपयुक्त ठरतात.
3. कलिंगडमध्ये प्रथिने आणि अमिनो अॅसिड्स असते जे पुरूषांच्या स्नायूंची ताकद वाढते. त्यामुळे या बियांचे नियमित सेवन केल्यामुळे शरीर अधिक मजबूत राहते.
4. कलिंगडच्या बियांमध्ये असलेले हेल्दी फॅट्स आणि मॅग्नेशियम हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयोगी ठरतात.
5.कलिंगडच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स असतात जे पुरूषांची त्वचा निरोगी ठेवतात तसेच केस मजबूत करण्यासही मदत करतात.
6. या बिया खाल्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होण्यास मदत होते.
7. कलिंगडच्या बियांमध्ये मॅग्नेशियम असते. बियांमधील मॅग्नेशियममुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते आणि थकवा कमी जाणवतो.












