Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • मधुमेहाच्या रुग्णांनी ऊसाचा रस प्यावा का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
ताज्या बातम्या

मधुमेहाच्या रुग्णांनी ऊसाचा रस प्यावा का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Sugarcane Juice for Diabetes

Sugarcane Juice for Diabetes: उन्हाळ्यात ऊसाचा थंडगार रस पिण्याचा मोह अनेकांना होतो, पण मधुमेह रुग्णांसाठी तो सुरक्षित आहे का? जास्त साखर असलेल्या या पेयाचा शरीरावर काय परिणाम होतो आणि तज्ज्ञ काय सांगतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

उन्हाळ्यात थंडगार ऊसाचा रस प्यायला अनेकांना आवडतो, पण ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी तो योग्य आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे. चवदार आणि ताजेतवाने वाटणारा हा पेय असला तरी त्यातील साखरेचे प्रमाण लक्षात घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा: Cicada कोविड स्ट्रेन आला समोर! काय आहेत लक्षणे आणि किती धोकादायक?

आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे डायबिटीजची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.. त्यामुळे खाण्या- पिण्याच्या सवयींबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक असते. ऊसाचा रस शरीराला ऊर्जा देतो आणि उष्णतेत ताजेतवाने ठेवतो, पण त्याचा परिणाम रक्तातील साखरेवर होऊ शकतो.

ऊसाच्या रसाबाबत तज्ज्ञांचे मत

तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाचे रुग्णांनी उसाचा रस पूर्णपणे टाळण्याची गरज नाही, पण तो खूप मर्यादित प्रमाणातच घ्यावा. यामध्ये नैसर्गिक साखर जास्त प्रमाणात असल्यामुळे ब्लड शुगर पटकन वाढू शकते.

काही तज्ज्ञ असेही सुचवतात की रस पिण्यापेक्षा ऊस चावून खाल्ल्यास अधिक फायदेशीर ठरते, कारण त्यात फायबर असते, जे साखरेचे शोषण हळूहळू करते.

उसाच्या रसात साखर किती असते?

एक ग्लास (सुमारे २४० मि.ली) उसाच्या रसात अंदाजे ४०-५० ग्रॅम साखर असू शकते. हे प्रमाण डायबिटीज रुग्णांसाठी जास्त मानले जाते, कारण त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते.

कोणती काळजी घ्यावी?

उसाचा रस रेकाम्या पोटी पियू नाये

एका वेळी कमी प्रमाणात सेवन करावे

डॉक्टरांचा सल्ला घेऊन आहारात बदल करावा

रक्तातील साखर नियमितपणे तपासावी

मधुमेह रुग्णांसाठी काही सुरक्षित आणि आरोग्यदायी पर्याय:

नारळाचे पाणी
साखरेशिवाय लिंबाचे पाणी
स्टेअर (एक प्रकारचा चहा)
ग्रीन टी

 

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts