• Home
  • ताज्या बातम्या
  • IGNOU चे हेल्थकेअर- सायकोलॉजी कोर्स वादात; आता विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात?
Top News

IGNOU चे हेल्थकेअर- सायकोलॉजी कोर्स वादात; आता विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात?

IGNOU

IGNOU Course Controversy: डिस्टन्स शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या IGNOU च्या काही कोर्सेसबाबत सध्या चर्चा रंगली आहे. UGC च्या नव्या नियमांमुळे विशेषतः हेल्थकेअर आणि सायकोलॉजीसारख्या अभ्यासक्रमांच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित होत असून, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ओपन आणि डिस्टन्स शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या IGNOU च्या काही कोर्सेसवर सध्या प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः हेल्थकेअर आणि सायकोलॉजीसारख्या विषयांमध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंगची गरज असताना हे कोर्स डिस्टन्स मोडमध्ये शिकवले जात असल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

हेही वाचा: मधुमेहाच्या रुग्णांनी ऊसाचा रस प्यावा का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

आज अनेक विद्यार्थी लवचिक शिक्षण पद्धतीमुळे IGNOU सारख्या विद्यापीठांची निवड करतात. मात्र, काही अभ्यासक्रमांच्या वैधतेबाबत आता चिंता व्यक्त केली जात आहे. कारण या क्षेत्रांमध्ये केवळ सैद्धांतिक ज्ञान पुरेसे नसून प्रत्यक्ष अनुभव अत्यंत महत्वाचा असतो.

नेमकी समस्या काय आहे?

हेल्थकेअर आणि सायकोलॉजीसारख्या अभ्यासक्रमांमध्ये क्लिनिकल किंवा प्रॅक्टिकल ट्रेनिंग आवश्यक असते. पण हे कोर्स डिस्टन्स मोडमध्ये केल्यास विद्यार्थ्यांना आवश्यक अनुभव मिळत नाही, अशी तज्ज्ञांची चिंता आहे.

सायकोलॉजी कोर्स चर्चेत का?

विशेषतः MA Psychology कोर्समध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतला जात असल्याने हा मुद्दा अधिक चर्चेत आला आहे. या क्षेत्रात पुढे करिअर करण्यासाठी प्रत्यक्ष प्रॅक्टिस आणि प्रशिक्षण आवश्यक असते. जर ते योग्य पद्धतीने मिळाले नाही, तर नोकरी आणि परवाना मिळवताना अडचणी येऊ शकतात.

UGC नियम काय सांगतात?

UGC च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ज्या कोर्समध्ये प्रॅक्टिकल किंवा क्लिनिकल ट्रेनिग आवश्यक आहे, ते कोर्स नियमित (रेग्युलर) पद्धतीनेच करणे योग्य मानले जाते. त्यामुळे अशा कोर्सच्या डिस्टन्स शिक्षणावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

पुढील करिअरवर परिणाम?

ज्या विद्यार्थ्यांना पुढे NET किंवा JRF सारख्या परीक्षा द्यायच्या आहेत, त्यांच्यासाठी हा मुद्दा महत्वाचा ठरतो. कारण या परीक्षांसाठी मान्यताप्राप्त पदवी आवश्यक असते. जर कोर्स मान्य नसेल, तर पुढील शिक्षण आणि करिअरच्या संधीवर परिणाम होऊ शकतो.

विद्यार्थ्यांनी काय करावे?

प्रवेश घेण्यापूर्वी कोर्सची मान्यता तपासावी

प्रॅक्टिकल ट्रेनिंग उपलब्ध आहे का, हे जाणून घ्यावे

अधिकृत माहिती आणि नियम काळजीपूर्वक वाचावेत

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts