Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • यूएईने इराण युद्धात भाग घेतल्यास दुबईला धोका; जेफ्री सॅक्सचा मोठा इशारा
Top News

यूएईने इराण युद्धात भाग घेतल्यास दुबईला धोका; जेफ्री सॅक्सचा मोठा इशारा

UAE Iran conflict

UAE Iran Conflict: अमेरिकेचे प्रमुख अर्थतज्ज्ञ जेफ्री सॅक्स यांनी चेतावणी दिली आहे की, जर यूएईने इराण युद्धात थेट सहभाग घेतला, तर दुबई आणि अबू धाबी यांसारख्या प्रमुख शहरांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

गल्फ प्रदेशातील महत्वाचे आर्थिक आणि पर्यटन केंद्र मानल्या जाणाऱ्या यूएईसमोर मोठे धोके निर्माण होऊ शकतात, जर देशाने इराणविरुद्धच्या संघर्षात थेट सहभाग घेतला, असा इशारा प्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ज्ञ जेफ्री सॅक्स यांनी दिली आहे. विशेषतः दुबई आणि अबू धाबी सारख्या शहरांच्या सुरक्षितेबाबत त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सॅक्स म्हणाले की, ही शहरे मुख्यतः पर्यटन, व्यवसाय आणि गुंतवणुकीसाठी विकसित झाली आहेत. ती लष्करीदृष्ट्या मजबूत संरक्षण असलेली क्षेत्रे नाहीत, त्यामुळे युद्धसदृश परिस्थितीत ती सहज लक्ष्य बनू शकतात.

परराष्ट्र धोरणावरही टीका

त्यांनी यूएईच्या परराष्ट्र धोरणावरही टीका केली आणि अमेरिका व इस्रायलसोबतची जवळीक धोकादायक ठरू शकते, असे मत व्यक्त केले. त्यांच्या मते, अशा आंतरराष्ट्रीय करारांमुळे आणि राजकीय भूमिकांमुळे देश अनावश्यक जोखमीकडे जात आहे.

सॅक्स यांनी असेही स्पष्ट केले की, अमेरिकेच्या संरक्षणावर अवलंबून राहणे ही मोठी चूक ठरू शकते. अनेक गल्फ देशांना वाटते की अमेरिकेची लष्करी उपस्थिती त्यांना सुरक्षित ठेवेल, पण प्रत्यक्षात परिस्थिती अधिक गुंतागुंतीची असते.

त्यांनी अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजर यांच्या प्रसिद्ध विधानाचा उल्लेख करत सांगितले की, जागतिक राजकारणात मोठ्या शक्तींवर अवलंबून राहणे नेहमीच सुरक्षित नसते.

यूएईने सध्याच्या परिस्थितीत सावध भूमिका घ्यावी आणि तणाव वाढवणाऱ्या निर्णयांपासून दूर राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

दरम्यान, इराणकडूनही कठोर भूमिका घेतली जात आहे. प्रादेशिक देशांनी अमेरिकेला त्यांच्या भूमीचा वापर लष्करी कारवाईसाठी करू देऊ नये, असा इशारा इराणने दिला आहे. त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीत मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts