Fruits to avoid in winter : हिवाळ्यात थंडीमुळे शरीर आतून थंड पडत, त्यामुळे पचनक्रिया मंदावते. आहारतज्ज्ञांच्या मते अशी काही फळे आहेत, जी थंडीच्या दिवसांत खाल्ली की खाणे आजारी पडण्याची दाट शक्यता असते. ही फळे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. तसेच ही फळे खाल्ल्याने सर्दी -खोकला असे आजार होण्याची शक्यता असते. तसेच पचनक्रियेवर परिणाम करतात. त्यामुळे काही ठराविक फळे हिवाळ्यात खाणं टाळलं पाहिजे. दैनंदिन खाण्यातील अशी कोणती फळे आहेत जी थंडीच्या दिवसांत खाल्ले की आपण आजारी पडण्याची दाट शक्यता असते. तेच आजच्या या लेखातून आपण माहिती करून घेऊ..
कलिंगड : हे फळ शरीराला थंडावा देत
उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्यास लाभधारक असलेलं कलिंगड हिवाळ्यात मात्र आजारी पडण्याचं आमंत्रण आहे. कलिंगड हे शरीराला थंडावा देत. म्हणून ते हिवाळ्यात खाल्ल्याने सर्दी किंवा घसा खवखव वाढू शकते. त्यात जास्त पाण्याचे प्रमाण खुप जास्त असते, व ते शरीराचे तापमान कमी करण्याचे काम करते. त्यामुळे हे फळ थंडीत खाल्लाने शरीराचे तापमान कमालीचे थंड होते आणि आपण आजारी पडतो.
हेही वाचा – हिवाळ्यात चेहऱ्यासोबत घ्या डोळ्यांची काळजी; काळजी घेतल्यास डोळे पडणार नाही कोरडे
खरबूज : थंडीच्या दिवसांत पचण्यास कठीण असते
खरबूज देखील शरीराला थंडावा देण्याचं काम करते. हिवाळ्यात जेव्हा पचनशक्ती कमकुवत असते, तेव्हा हे फळ पचण्यास कठीण होऊ शकते. हे फळ श्लेष्मा वाढवण्याचे काम करते, ज्यामुळे सर्दी आजार उद्भवण्याची शक्यता असते.
अननस : खाल्ल्यास घसा खखवणे, तोंड येणे सारख्या समस्या होतात
अननस हे अतिशय संवेदनशील फळ आहे. हिवाळ्यात जास्त प्रमाणात हे खाल्ले तर घसा खवखवणे, तोंड येणे किंवा एॅलर्जी अशा समस्या निर्माण होऊ शकतात. हिवाळ्यात त्याचे अननस खाण्याचे प्रमाण काही प्रमाणात जास्त झाल्यास रोगप्रतिकारक शक्तीवर कमी प्रामाणात परिणाम होऊ शकतो.
केळी : थंडीमध्ये खाल्याने श्लेष्मा वाढू शकते
थंड हवामानात केळीमुळे श्लेष्मा वाढू शकते आणि सकाळी केळी खाल्ल्यानंतर अनेकांना जडपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांत केळी खाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवणे आवश्यक असते.
द्राक्षे : द्राक्षे शरीरात थंडावा देतात आणि अनेकदा खोकला आणि सर्दी होऊ शकते. यामध्ये असलेले साखरेचे प्रमाण हिवाळ्यांच्या दिवसांत जास्त प्रमाणात नुकसानकारक ठरू शकते.
थंडीच्या दिवसांत ही फळो खाल्ली तर शरीरासाठी लाभदायक ठरू शकतात
वरील पैकी सर्व फळे ही थंडीच्या दिवसांत मर्यादित खाणे आवश्यक आहे. मात्र, अशी देखील काही फळे आहेत जी तुम्ही थंडीच्या दिवसांत खाल्ली तर शरीरासाठी लाभदायक ठरू शकतात. यामध्ये प्रामुख्याने सफरचंद, संत्री, पेरू, डांळिंब, बोर, किवी यांसारख्या फळांचा समावेश आहे. ही फळे अशी आहेत ती कोणत्याही दिवसांत म्हणजे बाराही महिने शरीराला लाभदायक ठरतात. सफरचंद, डाळिंब, पेरू, किवी, बोर, संत्री हे फळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते, तसेच व्हिटॅमिन सी समृद्ध असतात आणि शरीराला आतून उबदारपणा आणि ऊर्जा प्रदान करण्याच काम करतात.











