Lemon remedy for cold and cough : थंड हवामान आणि हवामानातील बदल यामुळे सर्दी, खोकलाच्या समस्या वारंवार डोके वर काढतात. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये आजारपणासाठी कोणाकडे वेळ असतो. आपल्याला औषध त्याचे होणारे साईड इफेक्ट नको असतात. अशावेळी फक्त घरच्या घरी एक नैसर्गिक उपाय करून आपण जुनाट सर्दी आणि खोकला दोन्हींपासून सुटका मिळवू शकतो. ते कसं जाणून घ्या
आपल्या आईच्या स्वयंपाकघरात लिंबू हा असतो म्हणजे असतोच. तुम्ही म्हणाल लिंबू खाल्ल्याने सर्दी होणार नाही का ? तर नाही. लिंबू हा विटामिन C ने परिपूर्ण असतो. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी, खोकला, घसा दुखणे, ताप येणे यावर परिणाम दिसून येतो. लिंबाचा रस घशातील जंतु नष्ट करतो. त्यामुळे श्वसनमार्गिका देखील स्वच्छ होतात. कारण या स्वयंपाकघरातलय लिंबूमध्ये दडलेलं आहे एक सर्दी खोकल्यावरचं नैसर्गिक औषध. हे औषध तुम्ही प्यायल्यास तुमचा जुन्यातला जुना सर्दी खोकला नाहीसा होईल.
असे करा सेवन
एक अर्धा लिंबू घ्या आणि त्यावर थोडं मीठ आणि हळद लावा. त्यानंतर हा लिंबू थोडासा गरम करा. गरम करण्यासाठी तुम्ही थोडसं गरम पाण्यात बुडवून किंवा गॅसवर क्षणभर फिरवून घेऊ शकतात. त्यानंतर हा लिंबू तोंडात ठेवा. आणि त्याचा रस हळूहळू घशात जाऊ द्या. तुम्ही हा उपाय दिवसातून दोन वेळेस केल्यास घशाला आलेली सूज कमी होते आणि खोकला सर्दी दूर होते.
असे होतात फायदे (Lemon remedy for cold and cough)
अशा पद्धतीने लिंबाचे सेवन केल्याने व्हिटॅमिन सी वाढते. शरीराची इम्युनिटी सुद्धा वाढते. घशातील जंतू मरतात आणि सूज कमी होते. याशिवाय सर्दी खोकलाचा त्रास कमी होऊन श्वसन देखील सुलभरीत्या चालते. याशिवाय शरीरात उष्णता निर्माण होऊन संक्रमणावर नियंत्रण मिळवता येते. परंतु जर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास असेल तर लिंबाचा वापर मर्यादित प्रमाणात करा. लहान मुलांसाठी वापरण्याआधी देखील डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
याशिवाय तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून पिऊ शकतात. जेणेकरून शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतील. हिवाळ्यात सहसा गार पदार्थ आणि थंड पेय पिणे टाळा. जेणेकरून तुमचा खोकला पुन्हा व डोके वर काढणार नाही.







