Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • महिलांसोबतच पुरुषांसाठी देखील महत्वाचे आहे लीप केअर
लाईफस्टाईल

महिलांसोबतच पुरुषांसाठी देखील महत्वाचे आहे लीप केअर

Lip Care for Men

Lip Care for Men : चेहऱ्याची काळजी घेणे स्किन केअर रुटीन पाळणे हे फक्त महिलांसाठी नाही तर पुरुषांसाठी देखील mahatv[पूर्ण असते. खास करून लीप केअर. अनेक पुरुषांना वाटतं कि, त्वचेची किंवा ओठांची काळजी फक्त महिलांचे काम आहे. लीप बाम, स्क्रब, मॉइश्चरायझर या सर्व गोष्टी पुरुषांसाठी नसून ते फक्त महिलांच्या सौन्दर्याची साधने असल्याचे पुरुषांना वाटते. परंतु प्रदूषण, हवामान आणि बदलती जीवनशैली या सर्वांमुळे पुरुषानं देखील लीप बामची गरज पडते. महिलांसोबतच पुरुषांचे ओठ देखील नाजूक आणि संवेदनशील असतात. त्यामुळे पुरुषांसाठी देखील ओठांची काळजी घेणे गरजेचे असते.

पुरुष असो की महिला दोघांच्या ओठांची त्वचा ही नाजूक असते. ओठांमध्ये इतर भागात असल्याप्रमाणे तेलग्रंथी नसतात. त्यामुळे ओठ लवकर कोरडे पडतात. आणि काळसर दिसायला लागतात. थंडी, ऊन, वारा, पाऊस, प्रदूषण या सर्वांचा परिणाम ओठांवर दिसून येतो. खास करून जास्तीत जास्त वेळ बाहेर राहणारे व्यक्ती या समस्येचा जास्तीत जास्त सामना करतात.

चुकीच्या सवयी

पुरुषांना सतत ओठांवर जीभ फिरवण्याची सवय असते. तर काही पुरुष तंबाखू धूम्रपान करत असल्याने त्यांचे ओठ काळे पडतात. आणि ओठांची नैसर्गिक चम निघून जाते. एवढेच नाही तर चहा कॉफीचे अतिसेवन करणे आणि कमी पाणी पिणे यामुळे ओठ कोरडे पडतात आणि फाटतातही.

आत्मविश्वास डगमगतो

चेहऱ्याचा महत्वपूर्ण भाग म्हणजे ओठ. संवाद साधताना सर्वात आधी लक्ष जाते ते म्हणजे ओठांवर. कोरडे फाटलेले आणि काळपट ओठांमुळे आपल्या व्यक्तिमत्वावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतात, बऱ्याचदा आपण कोणतेही व्यसन करता ओठ काळे पडलेले दिसले तर अनेकांना वाटत कि हा माणूस सिगरेट घेत असणार. कारण काळपट ओठ हे नकारात्मकता निर्माण करण्याचे काम करतात. त्यामुळे आपला आत्मविश्वा डगमगतो. सुंदर आणि निरोगी ओठ पुरुषांच्या आत्मविश्वासात भर घालण्याचे काम करतात. ऑफिसची मिटिंग, मुलाखत, प्रेझेन्टेशन या सर्व बाबींसाठी आपला आत्मविश्वास महत्वाचा असतो.

लीप केअर म्हणजे मेकअप नव्हे

आता बरेच जण म्हणाल की, आम्ही कशाला मेकअप करू? परंतु लक्षात ठेवा लीप केअर म्हणजे मेकअप नाही. तर लीप केअर म्हणजे ओठांची निगा राखणे, ओठ स्वच्छ करणे, ओठांना नैसर्गिक ओलावा देणे, नुकसान होण्यापासून संरक्षण मिळवून देणे. तुमची तुमच्या ओठांना मॉइश्चर देण्यासाठी नैसर्गिक लीप बा, खोबऱ्याचे तेल, तूप किंवा कोरफड जेलचा वापर करत असाल तर ते मेकअप प्रोडक्ट्स नाहीत. त्या आरोग्यदायी सवयी आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

हळदाची पाने : आयुर्वेदिक गुणांचा अनमोल खजिना हल्लीम (Garden Cress Seeds): आरोग्यासाठी नैसर्गिक सुपरफूड स्ट्रॉबेरी: गोड लाल आरोग्यदायी फळ सुंठ (Dry Ginger): आरोग्याचा खजिना साजूक तूप: आरोग्याचं अमृत, रोजच्या आहारातली सुवर्णकिल्ली!