Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • धमाल 4 येणार प्रेक्षकांच्या भेटीला; या तारखेला होणार प्रदर्शित
मनोरंजन

धमाल 4 येणार प्रेक्षकांच्या भेटीला; या तारखेला होणार प्रदर्शित

dhamal 4 realease date

Dhamaal 4 Release Date : सध्या अनेक चित्रपटांचा सिक्वेल नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानुसार आता अजय देवगणच्या हिट चित्रपटांपैकी एक असलेला ज्याने प्रत्येक चाहत्यांना, प्रेक्षकांना मनसोक्त हसवण्यासाठी परिश्रम घेतले. धम्माल या चित्रपटाचा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटाची तारीख देखील समोर आली आहे.

चित्रपटाची टीम प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज

बॉलिवूड मधील सर्वात लोकप्रिय चित्रपट म्हणजे धम्माल चित्रपटाची टीम प्रेक्षकांना हसवण्यासाठी तयार आहे. या चित्रपटाच्या चौथ्या भागात रितेश देशमुख, तुषार कपूर, अर्शद वारसी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 12 जून 2026 रोजी प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज असून या चित्रपटात नवीन कलाकारांचा देखील सहभाग असणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन इंदू कुमार यांनी केले असून चाहते चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे.

हे नवीन कलाकार झळकणार चित्रपटात

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंड विश्लेषक तरण आदर्श यांनी या चित्रपट प्रदर्शित कधी होणार याबाबत माहिती दिली आहे. या चित्रपटात इशा गुप्ता, संजीदा शेख, अंजली आनंद, उपेंद्र लिमये, विजय पाटकर, रवी किशन हे नवीन कलाकार असणार आहे.

हे ही वाचाबिग बॉसच्या घरातील सदस्य झाले भावुक; पहा काय घडलं

ईदच्या मुहूर्तावर होणार होता प्रदर्शित

धम्माल हा चित्रपट 2007 ध्ये पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर डबल धम्माल, टोटल धम्माल या सिक्वेलने भरपूर हसवलं. आता 2026 मध्ये धम्माल 4 प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट चाहत्यांना हसवण्यासाठी कोणत्या थराला जाणार हे पाहणे आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पाहणे सूचक ठरेल. हा चित्रपट अगोदरच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता परंतु मोठ्या चित्रपटांच्या गर्दीत स्पर्धा टाळण्यासाठी या चित्रपटाने त्यांची रिलीज तारीख बदलून घेतली.

चित्रपटाची कमाई

धमाल या चित्रपटाने 2007 मध्ये वर्ल्डवाईड 51.3 कोटी रुपयांची कमाई केली होती. नॉनस्टॉप कॉमेडी असल्याने हा चित्रपट फार गाजला. त्यानंतर चित्रपटाचा सिक्वेल डबल धमाल 2011 या वर्षी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने वर्ल्डवाईड 71 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर 2019 मध्ये धमाल चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर आता धमाल 4 देखील सुपरहिट चित्रपटाच्या यादीत येईल का हे पाहावे लागणारहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts