• Home
  • राजकारण
  • शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 2 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात; दोघांना पाठवण्यात आली नोटीस
Mumbai

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 2 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात; दोघांना पाठवण्यात आली नोटीस

Uddhav Group Corporators Notice

Uddhav Group Corporators Notice : नुकत्याच महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला. आता महापौर कोण होणार याकडे लक्ष लागून असून याबाबत जोरदार चर्चा रंगल्याचे बघायला मिळत आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप हा मोठा पक्ष ठरला असून 22 जानेवारी रोजी महापालिकेच्या महापौर पदाची सोडत पार पडणार आहे. या महापौर पदासाठी मुंबई महापालिकांसह कल्याण डोंबिवली महापालिके देखील राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे. अशातच आता शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेने नगरसेवक फोडले जाणार नाही याची दक्षता घेऊन थेट अज्ञानस्थळी ठेवले आहे. परंतु यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे 2 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.

2 नगरसेवकांना नोटीस

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 2 नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळताच आता 2 नगरसेवकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच दोन्ही नगरसेवकांवर आता शिवसेना ठाकरे गटाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासह पहिले अडीच वर्ष नक्की कोणाचा महापौर होणार यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्या मध्ये एकमत झाल्याचे बघायला मिळाले आहे.

हे ही वाचागडकरींचे ‘निवृत्ती’चे संकेत? म्हणाले, “आपण निवृत्त होण्याची आणि नवीन पिढीकडे सत्ता सोपवण्याची वेळ”

30 जानेवारीपर्यंत महापौर पदासाठी निवड होण्याची शक्यता

काहीही झाले तरीही आपले नगरसेवक फुटणारनाही याची काळजी घेण्यात येत आहे. तर 22 जानेवारी रोजी महापौर पदासाठी सोडत पार पडल्यानंतर 30 जानेवारीपर्यंत महापौर पदासाठी निवड होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने काही नगरसेवकांनी सध्या महापौर पदासाठी लॉबिंगची तयारी सुरु केली आहे. त्यानुसार 30 जानेवारीपर्यंत महापौर नक्की होणार तरी कोण ? आणि कोणत्या पक्षाचा हे लवकरच स्पष्ठ होईल.

पुण्यात शिवसेना शिंदे गटाने ईव्हीएम फोडल्या आणि जाळल्या

पुण्यातील कळस गावामध्ये आज शिंदे सेना व रिपब्लिकन सेनेच्या वतीने ईव्हीएम मशीन फोडत या मशीन जाळल्या. कळस गावामध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला कमी मत मिळाल्याने शिवसेना शिंदे आक्रमक झाली. लोकशाहीला काळीमा फासण्याची घटना या निवडणुकीत झाल्याचा निषेध करत विवेक बनसोडे यांनी ईव्हीएम मशीन हातोड्यांनी फोडली तर गिरीश जैवाळ आणि सतीश म्हस्के यांनी ईव्हीएम मशीन पेट्रोलने पेटवून दिल्या. ईव्हीएम विरोधात प्रभाग एक मधून आंदोलन सुरू झाला असून यासंदर्भात एकनाथ शिंदे यांच्याशी आम्ही बातचीत करणार आहोत. असे यावेळी सतीश मस्के गिरीश जैवाळ यांनी सांगितलं. मोठ्या संख्येने ग्रामस्थ या ठिकाणी आक्रमक झाले होते यावेळी मस्के यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहायला मिळाले. या निवडणुकी विरोधात आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचे मस्के यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts