• Home
  • मनोरंजन
  • अक्षय कुमारच्या ताफ्यातील वाहनाचा झाला अपघात; रिक्षाचालक जखमी; जाणून घ्या कसा घडला अपघात
Top News

अक्षय कुमारच्या ताफ्यातील वाहनाचा झाला अपघात; रिक्षाचालक जखमी; जाणून घ्या कसा घडला अपघात

Akshay Kumar Convoy Accident

Akshay Kumar Convoy Accident : बॉलिवूड अभिनेता सुपरस्टार अक्षय कुमार मुंबईतील जुहू याठिकाणावरून घरी जात असताना त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाचा रात्रीच्या सुमारास अपघात झाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अपघातात रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली असून रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. एका भरधाव येणाऱ्या मर्सिडीज कारने या ऑटोरिक्षाला धडक दिली.

काय आहे प्रकरण

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार जुहू येथील आपल्या घरी जात असताना त्यांच्या ताफ्याच्या अगदी मागे एक रिक्षा येऊन थांबली होती. परंतु एका अनियंत्रित मर्सिडीज कारने मागून येऊन रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की अपघातात ऑटो रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली आणि रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. सध्या या रिक्षा चालकावर क्रिटीकेयर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

कसा घडला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, सुपरस्टार अक्षय कुमार त्याच्या कारने घरी जात होता. त्याचवेळी त्याच्या गाडीच्या ताफ्यामागे बासित खान नावाचा एक तरुण एस्कॉर्ट वाहनाच्या अगदी मागे त्याची ऑटो रिक्षा चालवत होता. परंतु त्याचवेळी मागून वेगाने येणाऱ्या मर्सिडीज कारने ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत ऑटो रिक्षा चक्काचूर झाली. एवढेच नाही तर या मर्सिडीज कारने धडक दिल्यानंतर ब्रेक लावला नाही. त्यामुळे ऑटोरिक्षा एसयूव्ही कारच्या खाली गेली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी ऑटोरिक्षा अथक प्रयत्नांनी बाहेर काढली. यावेळी ऑटो रिक्षा चालक आत अडकलेला होता. त्यानंतर त्याला सुरक्षित बाहेरकाढून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही

स्थानिक नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे, या अपघातावेळी आवाज ऐकताच अक्षय कुमार देखील त्याच्या गाडीतून बाहेर पडला. परंतु परिस्थितीचे गांभीर्य आणि सुरक्षिततेच्या चिंतेमुळे त्याच्या टीमने त्याला ताबडतोब सुरक्षित ठिकाणी नेल्याचे वृत्त मिळाले आहे. त्यानंतर जुहू पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मर्सिडीज कार जप्त केली असून मर्सिडीज चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे, जरी पोलिसांनी अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. दरम्यान, अक्षय कुमारच्या पीआर टीमनेही संपूर्ण घटनेवर मौन बाळगले आहे. हा अपघात कसा घडला ? कारण काय आहे ? याचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts