Health Scheme Enforcement: महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांमध्ये उपचार असूनही रुग्णालये रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क मागत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत
आरोग्य योजनांच्या लाभार्थ्यांकडून शुल्क आकारल्यास याद राखा, असा इशारा देतानाच आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालयांवर एफआयआर दाखल करण्यात असे बजावले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. रुग्णांना एक रुपया देखील खर्च करावा लागणार नाही, अशा प्रकारची आरोग्य यंत्रणा राबवावी असेही त्यांनी नमूद केलंय.
हेही वाचा: फुटबॉल चाहत्यांना मोठा धक्का! स्पेन-अर्जेंटिना महासंग्राम युद्धामुळे रद्द
३६८ तक्रारी राज्यभरात
आरोग्य योजनांच्या लाभार्थ्यांकडून रुग्णालयांकडून शुल्क आकारले जात होते. याबाबत ३६८ तक्रारी राज्यभरात दाखल झाल्या होत्या. त्याची तपासणी करण्यात आली. त्यानुसार शुल्क आकारणाऱ्या रुग्णालयांकडून ६० लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती आबिटकर यांनी दिलीय.
तक्रारीची तपासणी
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांमध्ये उपचार असूनही रुग्णालये रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क मागत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत, त्यामुळे त्या तक्रारीची तपासणी केली जात असल्याचे आबिटकर म्हणाले.












