Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • उन्हाळ्यात ऑफिस लुकमध्ये बदल हवा? जिन्स-टॉपऐवजी ट्राय करा हे स्टायलिश आउटफिट्स
लाईफस्टाईल

उन्हाळ्यात ऑफिस लुकमध्ये बदल हवा? जिन्स-टॉपऐवजी ट्राय करा हे स्टायलिश आउटफिट्स

Summer Office Outfits

Summer Office Outfits: उन्हाळा सुरू होताच अनेकांना हलके आणि आरामदायक कपडे घालायला आवडतात. जर तुम्हीही रोज ऑफिसला जीन्स- टॉप घालून कंटाळले असाल आणि काही नवीन, स्टायलिश लुक ट्राय करायचे असेल, तर हे हलके आणि आकर्षक आउटफिट्स नक्की वापरून पाहा

उन्हाळा सुरू होताच अनेकांना हलके, आरामदायक कपडे घालायला आवडतात. पण रोजच्या ऑफिसच्या रूटीनमध्ये जीन्स- टॉपचं लूक सतत परिधान करणे कंटाळवाणे होऊ शकते. त्याशिवाय, सतत घट्ट आणि जाड कपडे उकाड्यात त्रासदायक ठरतात, घामाने कपडे अंगाला चिकटतात आणि त्वचेला खाज येऊ शकते. म्हणून, हलके, कूल आणि प्रोफेशनल आउटफिट्स निवडणे महत्वाचे आहे.

हेही वाचा: 26 मार्चला शेअर मार्केट बंद राहणार का? जाणून घ्या शेवटच्या आठवड्यातील सुट्ट्यांची यादी

सिगार पँट्स आणि शॉर्ट/ लॉग कुर्ता

सिगार पँट्स ही ऑफीससाठी एक स्टायलिश आणि आरामदायक पर्याय आहे. प्लाझो किंवा सेमी-फ्लेयर्ड पॅटर्नमध्ये मिळणाऱ्या या पँट्सवर साधा शॉर्ट कुर्ता किंवा हलका लाँग कुर्ता घालल्यास तुमचा लूक कूल आणि प्रोफेशनल दिसतो.

मिडी कॉटन स्कर्ट आणि हलके शर्ट

जर तुम्हाला स्कर्ट्समध्ये ऑफिसमध्ये स्टायलिश दिसायचे असेल, तर मिडी कॉटन स्कर्टसह हलका शर्ट घाला. ब्राइट किंवा हलके प्रिंटेड शर्ट्स तुम्हाला फ्रेश आणि ग्लॅमरस लूक देतात. या लूकला हलके बॅलेरीना फ्लॅट्स किंवा सँडल्ससह कंप्लीट करा.

कॉटन किंवा एथनिक वन पीस

कॉटन किंवा हलके एथनिक वन पीस ऑफिससाठी उत्तम पर्याय आहेत. हलके प्रिंट्स आणि नैसर्गिक कापड त्वचेला आरामदायक ठेवते. संध्याकाळी ऑफिसनंतर बाहेर फिरायला जाताना लहान स्टोल, हॅट आणि सँडल्स घालल्यास लूक एकदम आकर्षक दिसतो.

खादी किंवा कॉटन शर्ट-पँट कॉम्बिनेशन

उन्हाळ्यात खादी किंवा कॉटनचे शर्ट्स आणि हलके पँट्स घालणे उत्तम ठरते. हे कपडे त्वचेला आरामदायक ठेवतात आणि उकाड्यातही घाम शोषतात. प्लेन किंवा हलके प्रिंटेड शर्ट्स ऑफिसमध्ये प्रोफेशनल आणि मॉडर्न लूक देतात.

कॉर्ड सेट

कॉटनचे शॉर्ट किंवा लॉन्ग कॉर्ड सेट ऑफिससाठी परफेक्ट आऊटफिट आहे. हे हलके आणि फ्लोइंग प्लाझो पँट आणि टॉप प्लेन्स किंवा हलके प्रिंट्स असलेले पँटच्या रंगाशी सुसंगत कॉर्ड सेट परिधान करा.

 

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts