Benefits of Lemon and Mint Water: उन्हाळा सूरू झाला आहे. या काळात आपल्या शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी अनेक जण लिंबू पाणी किंवा पुदिन्याचे पाणी पितात. पण तुम्हाला माहिती आहे का कोणते पाणी जास्त फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊयात.
उन्हाळा सुरू झाला आहे आणि या काळात शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवणं अंत्यत आवश्ययक आहे. शरीरातून घामाच्या माध्यमातून पाणी झपाट्याने बाहेर निघतं, त्यामुळे योग्य प्रकारे हायड्रेटेड राहणं फार महत्वाचं असतं. अनेक लोक लिंबू पाणी पितात, तर काही जण पुदिन्याचे पाणी पसंत करतात. पण तुम्हाला माहिती आहे का कोणते पाणी तुमच्या आरोग्यसाठी जास्त फायदेशीर ठरते? चला तर जाणून घेऊयात.
हेही वाचा: ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल म्हणजे नेमकं काय? पाहा टॉप कार्स जिथे ‘हा’ फीचर मिळतो
लिंबू पाणी
लिंबू पाण्यात भरपूर ‘व्हिटॅमिन सी’ असते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. हे पाणी शरीराला थंड ठेवण्यास मदत करते आणि डिहायड्रेशनची जोखीम कमी करते. नियमित लिंबू पाणी प्याल्यास पचनक्रिया सुधारते, अॅसिडिटी कमी होते आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते.
पुदिन्याचे पाणी
पुदिन्याच्या पाण्यात थंडावा वाढवणारे घटक असतात. हे पाणी शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि दाह, पोटात गॅस किंवा पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यास प्रभावी ठरते. यासोबतच पुदिना शरीराला एनर्जी देतो आणि ताजेतवाने ठेवतो.
लिंबू-पुदिन्याचे मिश्रण
लिंबू आणि पुदिन्याचे पाणी मिळून शरीरासाठी आणखी फायदेशीर ठरते. हे मिश्रण शरीराला हायड्रेटेड ठेवते, पचन सुधारते, त्वचेला ताजेतवाने आणि चमकदार ठेवते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्यात किंवा व्यायामानंतर हे पाणी प्यायल्यास शरीर लगेच थंडावते आणि ऊर्जा मिळते.
कसे तयार करावे
एका ग्लास पाण्यात ताजे लिंबू काप किंवा रस घाला.
त्यात काही ताज्या पुदिन्याची पाने घालून मिसळा.
चवीनुसार थोडं मीठ किंवा साखर घालून प्यायला तयार करा.









