गुन्हा

अशोक खरातचा पाय आणखी खोलात; चौकशी सुरु असतानाच…!

kharat karnama

ashok kharat : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात (ashok kharat) याची लैंगिक शोषण प्रकरणी एसआयटी (SIT) पथकाकडून चौकशी सुरु असतानाच आता आणखी तीन महिला तक्रार देण्यासाठी पुढे आल्या आहेत. त्यामुळं खरात याचा पाय आणखी खोलात रुतला गेला आहे. खरात याच्या चौकशी प्रकरणाला आता वेग आला आहे. परिणामी खरात याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा: भोंदू अशोक खरात आता आयकरच्या रडारवर

आणखी तीन पीडित महिलांना विश्वासात घेऊन एसआयटीचा संवाद

एसआयटी पथकाने पीडित महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर या तिन्ही महिला अशोक खरात विरोधात अधिकृत तक्रार देण्यासाठी तयार झाल्या आहेत. खरातने केवळ आध्यात्मिक भीती दाखवूनच नाही, तर आर्थिक आणि मानसिक फसवणूक केल्याचा आरोपही या महिलांनी केला आहे. तक्रार देण्यासाठी तीन महिला समोर आल्याने खरातविरुद्धचा गुन्हा अधिक भक्कम होणार आहे.

मोठ्या अधिकाऱ्यांशी लागेबांधे?

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, खरातच्या सामाईक सातबाऱ्यांवर अनेक बड्या सरकारी अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची नावं असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे हे प्रकरण केवळ एका भोंदू बाबापुरते मर्यादित नसून, यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खरात याच्या जाळ्यात कोण?

खरात याच्या जाळ्यात केवळ महिलाच नसून सरकारी अधिकारीही असल्याचे बोलले जात आहे. एवढंच नाही तर खरात याच्या सामायिक सात-बारावर शासकीय अधिकाऱयांच्या नातेवाईकांची नावे असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील काही राजकीय नेत्यांचे फोटोही खरात बरोबर झळकले आहेत. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (sanjay raut)यांनी केली आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता सरकार कुठली पावले उचलते याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts