Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • TET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला बिहारमधून अटक; तपासाला नवं वळण
शैक्षणिक बातम्या

TET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला बिहारमधून अटक; तपासाला नवं वळण

maharashtra tet paper leak 2026

Maharashtra TET Paper Leak: TET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता यांच्या पत्नीला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागत असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षा (Maharashtra TET Paper Leak)  पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य संशयित बिजेंद्र कुमार गुप्ता यांच्या पत्नीला बिहारमधील पाटणा येथून अटक केली आहे. या प्रकरणात प्रथमच एका महिलेवर कारवाई करण्यात आली असून, तपासाला महत्वाचे वळण मिळाल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा: भीमराव कांबळेला ‘मरेपर्यंत फाशी’; पण प्रत्यक्ष फाशी कधी होणार? जाणून घ्या संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया

तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत बिहारमधील बिजेंद्र कुमार गुप्ता हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर ठाणे पोलिसांच्या विशेष पथकाने पाटणा येथे कारवाई करत त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले. तिच्याकडून या रॅकेटशी संबंधित महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. (Latest Education News)

यापूर्वी या प्रकरणात तीन आरोपीना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून टीईटी परीक्षेच्या (Maharashtra TET Paper Leak) चार प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत. उमेदवारांना पैसे घेऊन प्रश्नपत्रिका पुरविण्याचा कट उघडलीस आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली होती. (Lokshevay Marathi News)

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (School Education Minister Dada Bhuse)

दरम्यान, राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत माहिती देताना या संपूर्ण प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (SIT) करत असल्याचे सांगितले. तसेच, आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) लागू करता येईल का, याची कायदेशीर पडताळणी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जामीन मिळणे कठीण होईल

मकोका लागू झाल्यास आरोपींना जामीन मिळणे कठीण होईल आणि तपास यंत्रणांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी अधिक कालावधी मिळू शकतो. त्यामुळे या रॅकेटमधील इतर संशयितांपर्यंत पोहोचणे सोपे होईल, असा पोलिसांचा विश्वास आहे.

या प्रकरणाच्या तपासासाठी महाराष्ट्र पोलिसांची स्वतंत्र पथके बिहार, हरियाणा आणि दिल्ली येथे रवाना करण्यात आली आहेत. पेपरफुटी रॅकेटशी संबंधित इतर आरोपी आणि आर्थिक व्यवहारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा विचार

दरम्यान, भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी टीईटीसह इतर राज्यस्तरीय परीक्षा टप्प्याटप्प्याने ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा विचार सरकार करत आहे. यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असून, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी नवीन कार्यपद्धती तयार केली जाणार आहे. (LS Marathi News Channel)

महाराष्ट्र टीईटी-2026 परीक्षा पुढे ढकलण्यात आली (Maharashtra TET Paper Leak)

पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर 28 जून रोजी होणारी महाराष्ट्र टीईटी-2026 परीक्षा (Maharashtra TET Paper Leak) पुढे ढकलण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts