Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • अटकेच्या अगोदर अशोक खरातला भेटणारे ‘ते’ तीन IAS अधिकारी कोण?
गुन्हा

अटकेच्या अगोदर अशोक खरातला भेटणारे ‘ते’ तीन IAS अधिकारी कोण?

kharat ashok

ashok kharat : स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. खरातच्या अटकेच्या अवघ्या तीन दिवस आधी शिर्डीत (shirdi) राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांसोबत त्याची गुप्त बैठक झाल्याचे समोर आले आहे. या बैठकीमुळे प्रकरण अधिक चिघळणार आहे. तर खरातला भेटणारे ते तीन IAS अधिकारी कोण? याची राज्यभरात चर्चा सुरु झालीय. ही बैठक शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये पार पडल्याचे सांगितले जात आहे. ‘विनोद’ (vinod) नावाच्या व्यक्तीने ही भेट घडवून आणल्याची चर्चा आहे. शिर्डी परिसरात आरोपी कॅप्टन खरातचा विनोद नामक पंटर असल्याची माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा: अशोक खरातच्या तोंडचे पाणी पळाले; राज्य सरकारचा मोठा निर्णय कोणता?

‘त्या’ तीन IAS अधिकाऱयांची चौकशी होणार का?

अटकेच्या अगोदर अशोक खरात याला भेटणाऱ्या राज्यातील त्या तीन IAS अधिकाऱयांची चौकशी करणार का? त्यासाठी SIT प्रमुख आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या भूमिकेकडॆ लक्ष लागले आहे.

महिलांचे लैंगिक शोषण

दरम्यान, अशोक खरातवर महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप असून, त्याच्या ताब्यातून शंभरहून अधिक व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली आहे. ‘तांत्रिक विधी’ आणि दैवी शक्तींच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून त्यांचे शोषण केल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने SIT स्थापन केली असून, आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.

अनेक ठिकाणी मालमत्ता

तपासादरम्यान खरातच्या विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून, दोन लॅपटॉप, सुमारे 8 लाखांची रोकड, एक पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, नाशिकमधील आलिशान बंगला, कॅनडा कॉर्नर येथील कार्यालय आणि पाथर्डी परिसरातील सुमारे ३० एकर जमीन यासह मोठ्या प्रमाणात मालमत्ता असल्याचेही उघड झाले आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts