Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Cyclone Aqwan in Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धोका वाढला! आंध्र प्रदेश-ओडिशाच्या किनारपट्टीवर अलर्ट; मुसळधार पावसाची शक्यता?
महाराष्ट्र

Cyclone Aqwan in Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धोका वाढला! आंध्र प्रदेश-ओडिशाच्या किनारपट्टीवर अलर्ट; मुसळधार पावसाची शक्यता?

Bay of Bengal Cyclone
24
Cyclone Aqwan in Bay of Bengal :  २० नोव्हेंबरला नरसापूर ते पुरीदरम्यान किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता; वाऱ्याचा वेग ताशी १०० किलोमीटरपर्यंत जाण्याचा अंदाज.बंगालच्या उपसागरात ‘अक्वान’ चक्रीवादळ तीव्र झाल्याची माहिती समोर आली आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला संभाव्य धोका, हवामान विभागाच्या अलर्टकडे लक्ष.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘अक्वान’ (Aqvan) चक्रीवादळ अधिक तीव्र झाले असून आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD),हे चक्रीवादळ सध्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात असून उत्तर-वायव्य दिशेने सरकत आहे. २० नोव्हेंबर रोजी दुपारपर्यंत आंध्र प्रदेश, यानम आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीदरम्यान (Odisha Cyclone Warning) हे वादळ धडकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कुठे आणि कधी धडकणार चक्रीवादळ?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ‘अक्वान’ चक्रीवादळ २० नोव्हेंबर रोजी सकाळी किंवा दुपारपर्यंत नरसापूर ते पुरी या किनारपट्टीच्या पट्ट्यात, गोपाळपूरच्या पूर्वेकडे किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर आंध्र प्रदेश, यानम आणि दक्षिण ओडिशातील किनारी भागांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Cyclone Aqvan in Bay of Bengal)

हेही वाचा : Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; विजांसह वादळी पावसाची शक्यता

वाऱ्याचा वेग ताशी १०० किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता

चक्रीवादळ किनारपट्टी ओलांडताना वाऱ्याचा वेग ताशी ९० ते १०० किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी वाऱ्याच्या झोतांचा वेग ताशी ११० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे किनारपट्टी भागात जोरदार वारे आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागू शकतो. (Bay of Bengal Cyclone)

किनारपट्टीवरील नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागातील नागरिकांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ जाणे, समुद्रात उतरणे किंवा धोकादायक ठिकाणी थांबणे टाळावे. मच्छीमारांनी समुद्रात जाण्यापूर्वी अधिकृत सूचना तपासाव्यात. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक वस्तू आणि संपर्क क्रमांक जवळ ठेवावेत. (Andhra Pradesh Weather Update)

‘अक्वान’ चक्रीवादळाच्या हालचालींवर हवामान विभाग लक्ष ठेवून असून त्याच्या पुढील मार्ग आणि तीव्रतेबाबत वेळोवेळी अद्ययावत अंदाज प्रसिद्ध केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे. (News cyclone update)

LS Marathi – महाराष्ट्रातील बातम्या, पर्यटन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा

img

Shivani

Content Writer

Shivani Nagarale | Digital Journalist | News Writer | Digital Content CreatorHello! I am Shivani Nagarale, a digital journalist with two years of experience in journalism and digital media. Since beginning my professional journey in 2023, I have gained experience in various aspects of media, including digital content creation, news writing, information research, and content development for digital platforms.Alongside journalism, I have developed an understanding of digital media and digital marketing, gaining insights into content performance, audience engagement, and effective ways of reaching readers across digital platforms.Currently, I am working as a Digital Journalist at Loksevay, under LS Marathi, where I contribute to digital news production, covering current affairs, diverse news topics, informative articles, and reader-focused content. My approach to journalism emphasizes thorough research, factual accuracy, objective reporting, and clear, engaging writing.I believe in continuously adapting to the evolving landscape of digital journalism, exploring emerging media trends, and strengthening my editorial skills. My professional goal is to create credible, informative, and engaging content that bridges the values of responsible journalism with the growing reach of digital media.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts