• Home
  • महाराष्ट्र
  • भक्तांच्या घरी जायला खरात किती पैसे घ्यायचा? चक्रावणारी माहिती समोर!
Top News

भक्तांच्या घरी जायला खरात किती पैसे घ्यायचा? चक्रावणारी माहिती समोर!

Kharat devotees visit charges

Kharat devotees visit charges : नाशिकमधील नराधम भोंदूबाबा अशोक खरात (Charlatan Ashok Kharat) याच्याबाबत दिवसेंदिवस नवनवी माहिती समोर येताना दिसत आहे. अशोक खरात याच्या( Ashok Kharat)  भक्तगणांमध्ये अनेक बडे सरकारी अधिकारी, उद्योगपती आणि राजकारण्यांचा (Officials, Industrialists, and Politicians) समावेश होता. गरीब आणि सर्वसामान्य घरातील लोकांकडून फारसे पैसे मिळण्याची (A hefty sum for a visit) शक्यता नसल्याने अशोक खरात त्यांच्याकडे फारसे लक्षही द्यायचा नाही.

अशोक खरात याचे बहुतांश भक्त हे श्रीमंत असल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. हे भक्त अशोक घरात याला घसघशीत दक्षिणाही द्यायचे. यापैकी काही भक्त हे अशोक खरात याला आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, घरी, फार्म हाऊस अशा ठिकाणी घेऊन जाण्यासाठी इच्छूक असत. अशा एका आऊट डोअर व्हिजिटसाठी अशोक खरात हा तब्बल 5 लाख रुपये घेत असल्याची माहिती समजतेय.

हेही वाचा – ऑफिस की गुप्त अड्डा? साऊंडप्रूफ काच, काळे पेढे, काळी फळे अन्…, अशोक खरातच्या ऑफिसमध्ये आढळल्या धक्कादायक गोष्टी

भक्तगण बडे सरकारी अधिकारी, उद्योगपती आणि राजकारणी

सध्या एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून भोंदू खरातची पोलीस कोठडीची मुदत उद्या संपणार आहे. खरात याच्या भक्तगणांमध्ये अनेक बडे सरकारी अधिकारी, उद्योगपती आणि राजकारण्यांचाही समावेश होता. अशोक खरात याचे बहुतांश भक्त हे श्रीमंत, आर्थिकदृष्ट्या सुस्थितील असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्यापैकी काही भक्त हे भोंदू खरातला आपल्या घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी न्यायचे, त्याचं मार्गदर्शन त्यांना हवं असायचं.

व्हिजीटसाठी खरात बक्कळ पैसे उकळायचा

अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी अशोक खरात याच्या नाशिकमधील बंगल्यावर आणि कार्यालयात बड्या भक्तांची गर्दी होत असे. याठिकाणी खरातचा दरबार भरत असे. त्यामुळे या परिसरात अनेक महागड्या कार दिसायच्या. तांत्रिक विधींच्यादृष्टीने अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व असल्याने हे श्रीमंत भक्त अशोक खरात याने याचदिवशी आपल्यासोबत यावे, यासाठी आग्रही असत.

90 लाखांची महागडी कार खरेदी करायला लावली

या सगळ्यांपैकी जो जास्त पैसे देईल, त्याच्यासोबत अशोक खरात जात असे, अशी माहिती एसआयटीच्या तपासातून समोर आल्याचे समजते. पुण्यातील अशाच एका करोडपती भक्ताला अशोक खरात याने पूजा करण्यासाठी गाडी हवी, असे सांगून 90 लाखांची महागडी कार खरेदी करायला लावली होती. ही कार अशोक खरात याने स्वत:च्या नावावर करुन घेतली होती.

चार एकर भूखंड खरेदी प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

दरम्यान शिर्डीतील चार एकर भूखंड खरेदी प्रकरणी भोंदू अशोक खरातसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळ जमून मालक रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. जमिन खरेदी व्यवहारात फसवणुक केल्याप्रकरणी अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात , शिर्डी येथील मध्यस्थी अरविंद बावके , किरण सोनवणे आणि अशोक तांबे अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देत

अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देत जमीन बळकावल्याचा फिर्यादीत आरोप आहे. फसवणूक आणि सावकारकी अधिनियमांतर्गत शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिर्डीत भोंदू खरातची कोटयवधींची मालमत्ता असून सर्व व्यवहारांची SIT कडून चौकशी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts