लवकरच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक पार पडणार असून जानेवारी अखेर पर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. यानुसार आता प्रारूप मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करण्यात येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अपडेट येत असून आज राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समितीच्या सार्वजनिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाणारा आहे. त्यावर 14 ऑक्टोबर पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. तसेच अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाणार असून विधानसभेची मतदार यादी या निवडणुकींसाठी वापरण्यात येणार आहे.
निर्वाचक गणनिहाय मतदार यादी तयार करण्यासाठी विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदारांची नावे व पत्ता तसाच ठेवला जाणार आहे. या यादीत नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे किंवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे आदी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जाणार नसल्याची माहिती मिळाली आहे.
कोणकोणती कामे होणार
हरकती व सूचनांच्या अनुषंगाने फक्त मतदार यादीचे विभाजन करत असताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे या यासाख्या दुरूस्त्या हरकीत व सूचनांच्या अनुषंगाने करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेनंतर या याद्या अंतिम करण्यात येईल.