Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • मुंबईकरांनी घराणेशाहीला नाकारलं, दिग्गजांना घरचा रस्ता…
Top News

मुंबईकरांनी घराणेशाहीला नाकारलं, दिग्गजांना घरचा रस्ता…

Rejection of Dynastic Politics in Mumba

Rejection of Dynastic Politics in Mumbai : मुंबई महापालिका निवडणुकीत यंदा मतदारांनी घराणेशाही नाकारल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सर्वाधिक फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसलाय. शिंदे सेनेचे नेते सदा सरवणकर यांचा मुलगा आणि मुलगी चिरंजीव, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी, खासदार रवींद्र वायकर तसेच अरुण गवळी यांच्या कन्या, काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचे जावई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे बंधू यांच्यासह अनेक नेत्यांच्या कुटुंबीयांना पराभवाचा धक्का बसला आहे. मुबंईकरांनी घराणेशाहीला नाकारल्याचे दिसून येत आहे. त्याचा थोडक्यात आढावा घेऊयात…

हेही वाचा – पुणे महापालिकेतील ‘बिग फाईट्स’ भल्याभल्यांची हवा ताईट

खासदार रवींद्र वायकरांना होमग्राऊंडवर मोठा धक्का

शिंदेच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना त्यांच्या होमग्राऊंडवर मोठा धक्का बसलाय. जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात रविंद्र वायकर एक जागा देखील निवडून आणू शकले नाहीत. वायकर यांना आपल्या मुलीला निवडून आणण्यात देखील अपयश आलंय. ठाकरेंचे आमदार अनंत बाळा नर यांनी वायकरांच्या गडाला सुरुंग लावलाय. बाळा नर यांच्या नेतृत्वात 7 जागा ठाकरे गटाने तर मनसेचा एका जागेवर विजय संपादन केलाय. त्यामुळे जोगेश्वरीत शिंदे गट झिरो रन वर ऑल आऊट झाल्याची चर्चा रंगली आहे.

माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी वैशाली शेवाळे पराभव

मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे सेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी वैशाली शेवाळे या प्रभाग क्रमांक १८३ मधून निवडणूकीच्या रिंगणात होत्या. त्यामुळे राहुल शेवाळे यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली होती, मात्र इथे वैशाली शेवाळे यांचा सपाटून पराभव झालाय. त्यामुळे हा राहुल शेवाळे यांच्या राजकीय कारकीर्दीला मोठा धक्का मानला जात आहे. मुंबईकरांनी आधी लोकसभेत राहुल शेवाळे यांना तर आता महापालिके त्यांच्या वहिणींना डावलल्याचे दिसून येत आहे.

मुंबईत महायुतीला कौल, दादर-माहिमकरांनी उद्धव आणि राज यांना साथ

मुंबई महापालिकेत मुंबईकरांनी महायुतीला जनतेने कौल दिलाय. मात्र, दादर-माहिमकरांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी साथ दिलीय. शिंदेसेनेचे नेते सदा सरवणकर यांचा विधानसभेला पराभव झाला होता. त्यानंतर आता मुलगा समाधान सरवणकर आणि मुलगी प्रिया सरवणकर गुरव यांचाही पराभव झालाय. या ठिकाणी ठाकरे सेनेच्या विखाखा राऊत आणि निशिकांत शिंदे यांनी विजयश्री खेचून आणलीय. “हा माझा विजय नाही तर दादर प्रभादेवीचा विजय आहे. शिवसेना-मनसेचा विजय आहे. मला भूतकाळात जायचे नाही. निष्ठा ही निष्ठाच असते. ठाकरे हे ठाकरेच असतात, निकालानंतर निशिकांत शिंदे अशी प्रतिक्रिया दिलीय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनाही मतदारांनी मोठा धक्का दिला आहे. त्यांचे बंधू कप्तान मलिक यांचा मुंबईतील प्रभाग क्रमांक १६५ मध्ये काँग्रेसचे आशरफ आझमी यांनी पराभव केला. अरुण गवळी यांची मुलगी आणि अखिल भारतीय सेनेच्या उमेदवार योगिता गवळी यांचा पराभव झालाय. काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचे चिरंजीव हैदर शेख आणि बहिण कमरजहा सिद्दिकी यांचा विजय झाला तर त्यांचे जावई आहात खान यांचाही पराभव झालाय. त्यामुळे मुंबईकरांनी घराणेशाहीला सफसेल नारल्याचं दिसून येत आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts