• Home
  • ताज्या बातम्या
  • कुठे पाऊस तर कुठे उन्हाचा तडाखा; महाराष्ट्रात आज हवामानाचा डबल गेम; पहा दिवस कसा असेल
महाराष्ट्र

कुठे पाऊस तर कुठे उन्हाचा तडाखा; महाराष्ट्रात आज हवामानाचा डबल गेम; पहा दिवस कसा असेल

Maharashtra Weather Today
1
Maharashtra Weather Today: महाराष्ट्रात आज हवामानाचा दुहेरी अंदाज पाहायला मिळणार आहे. काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे, तर काही भागांत उन्हाचा चटका जाणवू शकतो. हवामान विभागाने 24 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.

महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाचा जोर कमी झाला असला, तरी आज काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील एकूण 24 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी (IMD Yellow Alert) करण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

हेही वाचा: 20 September 2026 Horoscope: ‘या’ राशींना होणार धनलाभ? जाणून घ्या आजचं तुमचं राशिभविष्य

कोकण विभाग

कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील ( Maharashtra Rain Alert) नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागांनाही हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा (IMD Weather Update) दिला आहे.

मराठवाडा

मराठवाड्यात बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड येथे पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे. इतर काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून स्थानिक पातळीवर पावसाच्या सरी कोसळू (Maharashtra Rain Forecast) शकतात.

मान्सूनच्या परतीची प्रक्रिया सुरू

दरम्यान, राज्यातून मान्सूनच्या परतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उत्तर अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून पुढील काळात ही हवामान प्रणाली अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकण्याचा अंदाज आहे.

काही भागांत उष्णतेचाही अनुभव

पावसासोबतच राज्यातील काही भागांत उष्णतेचाही अनुभव येत आहे. सोलापूरमध्ये 36.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून ते राज्यातील सर्वाधिक तापमान ठरले. त्यानंतर चंद्रपूर 35.8, अमरावती 35.6 आणि अकोला 35.1 अंशांवर होते.

गडचिरोलीतील देसाईगंज येथे 60 मिमी पावसाची नोंद झाली. नागरिकांनी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांच्या वेळी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts