Matheran mini train timetable : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता पर्यटनाची आवड असलेल्यांसाठी माथेरानची मिनी ट्रेन म्हणजेच माथेरानची राणी म्हणून प्रसिद्ध असलेली ट्रेन लवकरच धावणार आहे. मान्सून नंतर थांबवण्यात आलेली ही सर्विस आता 6 नोव्हेंबर पासून म्हणजेच उद्यापासून सुरु होणार असून पर्यटकांसाठी पुन्हा एकदा डोंगररांगा निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येणार आहे.
मध्य रेल्वेच्या नेरळ माथेरान या रुट दरम्यान धावणारी मिनी ट्रेन सहा नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही ट्रेन जून ते ऑक्टोबर या महिन्यात बंद ठेवण्यात येते. या काळात पर्यटकांना प्रवास करण्यासाठी अमन लॉज आणि माथेरान यादरम्यान शटल सेवा वेळापत्रकानुसार सुरूच असतात. परंतु आता मिनी ट्रेन देखील सुरू झाल्याने पर्यटकांना डोंगररांगांमधून प्रवास करता येईल. आणि पर्यटनाचा आनंद घेता येईल.
असे असेल वेळापत्रक (Matheran mini train timetable)
नेरळ ते माथेरान
नेरळ येथून सकाळी 8:50 मिनिटांनी 52103 क्रमांकाची ट्रेन सुटेल. आणि त्यानंतर 11:30 वाजता पोहोचेल. यानंतर याच मार्गावरील ट्रेन 52105 क्रमांकाची याच मार्गावरील ट्रेन नेरळ येथून सकाळी 10:25 वाजता सुटेल आणि माथेरानला दुपारी 1:5 मिनिटांनी पोहोचेल.
माथेरान नेरळ अप
माथेरान येथून नेरळ जाणारी 52104 क्रमांकाची गाडी दुपारी 2:45 मिनिटांनी सुटेल. तर नेरळ येथे 5:30 मिनिटांनी पोहोचेल. याच मार्गवरील दुसरी गाडी 52106 क्रमांकाची ट्रेन माथेरान येथून 4:00 वाजता सुटेल आणि नेरळ येथे सायंकाळी 6:40 मिनिटांनी पोहोचेल.
अमन लॉज माथेरान शटल सेवा
अमन लॉज ते माथेरान या मार्गावर धावणारी 52153 क्रमांकाची गाडी सकाळी 8:45 मिनिटांनी सुटेल. तर माथेरान येथे 9:00 वाजता पोहोचेल. यासह 52155 क्रमांकाची गाडी याच मार्गावर 9:35 वाजता सुटेल तर माथेरानला 9:53 वाजता पोहोचेल. या मार्गावर विविध गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून प्रवाशांना कोणतीही अडचण येणार नाही.
शनिवार रविवार विशेष सर्विस
शनिवार रविवारी विशेष1 ही गाडी अमन लॉज इथून 10:30 वाजता सुटेल तर माथेरानला 10:48 मिनिटांनी पोहोचेल. त्यानंतर विशेष 3 नंबरची गाडी अमन लॉज येथून 1:30 वाजता 1:35 मिनिटांनी सुटेल तर माथेरानला 1:53 मिनिटांनी पोहोचेल. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.












