Police recruitment application process : अनेकांचे पोलीस होण्याचे स्वप्न असते. हे स्वप्न साकारण्यासाठी एमपीएससी परीक्षेची तयारी मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी करत असतात. आता पोलीस भरतीला सुरुवात झाली असून अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. ही तुमच्यासाठी मोठी संधी असून या संधीचे सोनं करा. जाणून घ्या अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची तारीख.
तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण संधी चालून आली आहे. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने तुम्ही कोणत्याही ठिकाणावरून भरती साठी अर्ज प्रक्रिया आरामात करू शकतात. या पोलीस भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणी पास झालेल्या तरुणाई तरुण यांची निवड लेखी परीक्षेसाठी करण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 108 पोलीस पदांची भरती होणार असून जळगाव जिल्ह्यात तब्बल 171 पदे भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पोलीस भरती प्रक्रियेचे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले असून 30 नोव्हेंबर पर्यंत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येऊ शकतो.
शैक्षणिक पात्रता लागू
पोलीस भरती 2025 साठी विविध अटी लागू करण्यात आले आहेत. त्यानुषंगाने वयाची आणि शिक्षणाची अट लागू असून काही प्रमाणपत्र देखील अर्जदारांकडे असणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल करू शकत नाही. प्रमाणपत्रांमध्ये तुमच्याकडे दहावी-बारावी पदवीचे मार्कशीट असणे अत्यावश्यक आहे. याशिवाय तुम्ही मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेत असाल तर गुणपत्रिका तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे.
हे हि वाचा : शेतकऱ्यांचा खात्यावर जात पैसे नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही; बच्चू कडू
हे प्रमाणपत्र आवश्यक
पोलीस भरतीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, डिप्लोमा किंवा आयटीआय केला असल्यास मार्कशीट , टीसी , कास्ट सर्टिफिकेट वयाचा पुरावा, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट याशिवाय रहिवासी, बोनाफाईड हे प्रमाणपत्र आवश्यक आहेत. तसेच तुम्ही खेळाडू असाल तर खेळाडू प्रमाणपत्र किंवा वडील पोलीस विभागात असतील तर त्याचेही प्रमाणपत्र आवश्यक आहे. या पोलीस भरतीसाठी महिलांना 30 टक्के आरक्षणाचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
असे असणार परीक्षेचे स्वरूप (Police recruitment application process)
ही अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्यात येणार असून याबाबतची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रियेमध्ये 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर 100 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. शारीरिक चाचणी मध्ये 50% गुण मिळवणारे उमेदवार एकास दहा या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र असतील. तर लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य असणार आहे.










