Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • पुण्यातील पेट्रोल पंप संध्याकाळी 7 वाजेनंतर बंद ठेवण्याचा निर्णय मागे; नियमित सुरु राहणार पेट्रोलपंप
Pune

पुण्यातील पेट्रोल पंप संध्याकाळी 7 वाजेनंतर बंद ठेवण्याचा निर्णय मागे; नियमित सुरु राहणार पेट्रोलपंप

Pune petrol pumps to remain open after decision to close them after 7 PM withdrawn

Pune petrol pumps remain open : शहरातील पेट्रोल पंप संध्याकाळी 7 वाजेनंतर बंद करण्याचा निर्णय पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने घेतला होता. आता हा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि प्रवक्ते यांनी काल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन त्यांनी हा निर्णय मागे घेतला आहे.

पुणे शहरात वाढती गुन्हेगारी आणि हल्ले थांबण्यास तयार नाही. यामुळे पुणे शहरातील पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमानुल्ला खान आणि प्रवक्ते अली दारूवाला यांनी संध्याकाळी 7 वाजेनंतर पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची असोसिएशनचे अध्यक्ष आणि प्रवक्ते यांनी भेट घेतलाय होती. भेटी दरम्यान चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय मागे घेत असल्याचे सांगितले.

काय आहे संपूर्ण प्रकरण

काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील येरवडा भागातील पेट्रोल पंप याठिकाणी कामगारावर हल्ला झाला होता. हे प्रकरण जुने होण्यापूर्वी पुन्हा एकदा याचठिकाणी अजून एक हल्ला झाल्याची माहिती पुन्हा समोर आली होती. त्यामुळे पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने संध्याकाळी 7 नंतर पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आणि शहरातील पेट्रोल पंपावर वाढणाऱ्या हल्ल्याच्या घटनांबाबत असोसिएशनने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

हे हि वाचा – महाराष्ट्रात येणार थंडीची लाट; काही दिवसात थंडीचा काडाखा आणखीन वाढण्याची शक्यता

घेतला हा निर्णय (Pune petrol pumps remain open)

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि प्रवक्ते यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला.चर्चेनंतर पोलीस आयुक्तांनी ज्या पंपावर हल्ला झाला होता त्या पंपावर तात्काळ पोलीस सुरक्षा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दाखवलेल्या प्रतिसादामुळे पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि प्रवक्ते यांनी हा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेऊन पुन्हा सर्व पेट्रोल पंप सुरु केले.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts