Ram Temple construction completed Ayodhya : शतकानुशतकं चाललेल्या वादानंतर, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळं अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशापासून अयोध्येत राम मंदिराचं बांधकाम सुरु होतं. यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापनाही करण्यात आली. ट्रस्टनं आता अयोध्येत राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. ट्रस्टनं राम मंदिर पूर्ण झाल्याबद्दल सर्व राम भक्तांचं अभिनंदनही केलं आहे. यासह ट्रस्टनं पूर्ण झालेल्या कामांची माहिती देखील दिली आहे.
मंदिराचं सर्व बांधकाम पूर्ण :
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर राम मंदिर पूर्ण झाल्याची घोषणा केली. ट्रस्टनं X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “सर्व श्री राम भक्तांना कळवण्यास आम्हाला आनंद होत आहे की सर्व बांधकाम पूर्ण झालं आहे. मुख्य मंदिर, सहा मजबूत मंदिरं भगवान शिव, भगवान गणेश, भगवान हनुमान, सूर्यदेव, देवी भगवती, देवी अन्नपूर्णा आणि शेषावतार मंदिर देखील पूर्ण झाले आहेत. या मंदिरांवर ध्वजस्तंभ आणि कलश स्थापित करण्यात आले आहेत.”
सभी श्रीरामभक्तों को यह जानकारी देते हुए हर्ष हो रहा है कि मंदिर निर्माण सबंधी सभी कार्य पूर्ण हो गए हैं अर्थात- मुख्य मंदिर, परकोटा के ६ मंदिर – भगवान शिव, भगवान गणेश, भगवान हनुमान, सूर्यदेव, देवी भगवती, देवी अन्नपूर्णा तथा शेषावतार मंदिर भी पूर्ण हो चुके हैं। इन पर ध्वजदण्ड एवं…
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) October 27, 2025
सप्त मंडपाचं बांधकामही पूर्ण :
ट्रस्टनं पुढं म्हटलं आहे की, “याव्यतिरिक्त, सप्त मंडपाचं बांधकाम, म्हणजेच महर्षी वाल्मिकी, वशिष्ठ, विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, शबरी आणि ऋषी यांच्या पत्नी अहल्या यांच्या मंदिरांचं बांधकामही पूर्ण झालं आहे. संत तुलसीदास मंदिराचं बांधकामही पूर्ण झाले आहे. तसंच जटायू आणि गिलहरीच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. पर्यटकांच्या सोयीशी किंवा व्यवस्थेशी थेट संबंधित सर्व कामे पूर्ण झाली आहेत.”
हे हि वाचा : Montha cyclone alert : कधी आणि कुठे धडकेल मोंथा चक्रीवादळ? ‘या’ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
या ठिकाणी काम प्रगतीपथावर (Ram Temple construction completed Ayodhya)
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनं म्हटलं आहे की, “नकाशानुसार रस्ते आणि फरसबंदीचं काम एल अँड टी कडून केलं जात आहे आणि 10 एकर पंचवटीचं बांधकाम, ज्यामध्ये जमिनीचं सौंदर्यीकरण, हिरवळ आणि लँडस्केपिंग यांचा समावेश आहे, जीएमआर कडून जलद गतीनं केले जात आहे. जनतेशी थेट संबंधित नसलेली कामं सध्या सुरू आहेत, जसं की 3.5 किलोमीटर लांबीची सीमा भिंत, ट्रस्ट कार्यालय, अतिथीगृह, सभागृह इ..” असंही ट्रस्टनं म्हटलं आहे.








