Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
Top News

आयोध्येतील ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळ्यास इकबाल अंसारी उपस्थित

Iqbal Ansari Ayodhya flag hoisting : आज अयोध्येत ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडणार आहे. आज नरेंद्र मोदी भगवा ध्वज राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरातील या ध्वजारोहण समारंभात बाबरी मशीद प्रकरणातील माजी वादी इकबाल अंसारी यांना देखील आमंत्रित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या आमंत्रणामुळे इकबल अंसारी आनंदी झाले असून त्यांनी आनंद व्यक्त करत भाष्य केले आहे.

आज देशभरातून राम भक्त, भाविक आयोध्येत रवाना झाले आहेत. आज आयोध्येत आनंदी वातावरण दिसून येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देखील नुकतेच आगमन झाले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आयोध्येतील 191 फुट उंच शिखरावर पवित्र भगवा ध्वज फडकवणार असून राम मंदिराच्या पूर्णत्वाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. अशातच बाबरी मशीद प्रकरणातील माजी वादी इकबाल अंसारी यांना आमंत्रित करण्यात आल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

 

काय म्हणाले इकबल अंसारी

ANI सोबत इकबल अंसारी यांनी संवाद साधला असता ते म्हणाले, आयोध्या हे धर्माचे शहर असून सर्व धर्मांचे देवदेवता, संत, ऋषि याठिकाणी वास करत आहे. प्रभू श्री रामांचे भव्य मंदिर उभारण्यात आले असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. ही एक आनंदाची बाब असून देशभरातून भाविक याठिकाणी येत आहे. मला देखील या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले असून मी देखील उपस्थित राहणार आहे.

हिंदू आणि मुस्लिमांमध्ये ऐक्य असावे

हिंदू मुस्लिम ऐक्य, सद्भाव आणि देशाच्या प्रगतीमध्ये सर्वानी सहभागी व्हावे ही आमची ईच्छा असून देशात शांतता राहावी आणि सद्भाव वाढवा. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये ऐक्य असावे देशाची प्रगती व्हावी ही आमची आशा आहे. असे वक्तव्य इकबल अंसारी यांनी ANI  सोबत बोलताना केले.

 

सनातन संस्कृतीचा पुनरजगारण

यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या सोहळ्याला सनातन संस्कृतीचा पुनरजगारण संबोधले आहे. आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संत, भाविक भक्त आणि मान्यवरांचे स्वागत केले.

हे ही वाचा : अयोध्येत धर्म ध्वजारोहण सोहळा, ‘असा’ असणार पंतप्रधान मोंदींचा अयोध्येतील नियोजित कार्यक्रम

ध्वजावर आहे हे मुख्य चिन्हे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फडकवणार असलेल्या ध्वजवर धर्म ध्वजावर ओम, सूर्य आणि कोविदार वृक्ष ही तीन चिन्हे दर्शवण्यात आली आहेत. यातील सूर्य चिन्ह हे प्रभू रामाच्या सूर्यवंशीय परंपरेचे प्रतीक मानले जाते. तर कोविदार वृक्ष मंदार आणि पारिजात यांच्या संकरातून ऋषि कश्यप यांनी निर्माण केला असल्याचे वर्णन पुराणात करण्यात आले आहे.

img

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts