• Home
  • ताज्या बातम्या
  • पेट्रोल बचतीपासून ऑनलाइन क्लासेसपर्यंत; मोदींचे देशवासियांना 10 मोठे आवाहन
ताज्या बातम्या

पेट्रोल बचतीपासून ऑनलाइन क्लासेसपर्यंत; मोदींचे देशवासियांना 10 मोठे आवाहन

Modi

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून एक महत्वाचा संदेश दिला असून इंधन बचत, डिजिटल शिक्षण, स्वदेशी वापर आणि परदेशी खर्च कमी करणे यांसारख्या विविध मुद्द्यांवर १० मोठी आवाहन केली आहेत. बदलत्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन महत्वाचे मानले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक विशेष संदेश दिला आहे, ज्यामध्ये त्यांनी इंधन बचत, स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे आणि डिजिटल कामकाजावर भर देण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. जागतिक तेल संकट आणि परकीय चलनाचा जास्त खर्च यामुळे त्यांनी नागरिकांना काही महत्वाचे पाऊल उचलण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा: पुन्हा लागणार लॉकडाऊन? पेट्रोल दरवाढ आणि PM मोदींचं आवाहन; भारतात WFHचा फॉर्म्युला लागू होणार का?

गुजरातमधील कार्यक्रमात पंतप्रधानांनी सांगितले की, जर देशातील नागरिकांनी एकत्र प्रयत्न केला तर कोणतीही संकटे देशाच्या विकासात अडथळा ठरू शकणार नाहीत.

डिजिटल कामकाज आणि ऊर्जा बचत

पंतप्रधानांनी नागरिकांना कामकाजाच्या पद्धतीत बदल करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये ऑनलाईन मीटिंग्स आणि शाळांसाठी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय यावर विशेष भर आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहन देऊन इंधन बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

परदेशी खर्चावर नियंत्रण

परकीय चलनाचा खर्च कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी सांगितले की, परदेशी प्रवास, विदेशी खरेदी आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी परदेशाचे जास्त प्रमाणात निवड न करता देशातील पर्याय निवडावे. यामुळे देशांतर्गत उद्योग आणि पर्यटनाला चालना मिळेल.

पंतप्रधानांचे 10 महत्त्वाचे आवाहन

परिस्थिती स्थिर होईपर्यंत सोन्याची खरेदी टाळावी.
डेस्टिनेशन वेडिंगसाठी परदेशाऐवजी भारतातील ठिकाणे निवडावीत.
परदेशी सुट्ट्यांऐवजी भारतातील ऐतिहासिक आणि नैसर्गिक स्थळांना भेट द्यावी.
परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी विदेशी पर्यटकांना भारतात येण्यास प्रोत्साहित करावे.
प्रवासासाठी मेट्रो आणि सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करावा.
कामाच्या ठिकाणी शक्य असल्यास ऑनलाइन मीटिंग्स घ्याव्यात.
शाळांनी डिजिटल किंवा ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय अधिक वापरावा.
शेतीमध्ये स्वदेशी उत्पादने व पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करावा.
खाद्यतेलाचा आणि इंधनाचा वापर मर्यादित ठेवावा.
स्थानिक उत्पादने खरेदी करून देशी उद्योगांना प्रोत्साहन द्यावे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts