CM Fadnavis Big Announcement for Ladki Bahin Yojna : केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या योजना राबवण्याचे काम करते. मात्र, आतापर्यंतच्या सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक असलेली राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. या योजनेसाठी पात्र असलेल्या राज्यातील लाखो महिलांना दरमहा १५०० हजार रुपये आर्थिक मदत केली जाते. याच संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे कोणीच बंद करू शकणार नाही, असे म्हणत एकप्रकारे विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या नरेटिव्हची हवाच काढून टाकली आहे.
हेही वाचा – लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार
अहिल्यानगरमधील कोपरगाव येथे नगराध्यक्षपदाचे भाजपा उमेदवार पराग संधान व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या सभेमध्ये दूर पर्यंत गर्दी दिसतेय. जणू भाजपचे सर्व मतदार या सभेत आले आहेत असं दिसत आहे. 3 तास उशिर झाला तरी आपण थांबला आहात. याचा अर्थ तुम्ही भाजपला आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतलाय. आता आम्ही आलो आहोत उमेदवार पराग संधान यांचं विकासाशी संधान बांधून देण्यासाठी, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
वचन विश्वासाचे, कोपरगावच्या उज्ज्वल भविष्याचे, भाजपाच्या महाविजयाचे!
भाजपाच्या महाविजयाचा संकल्प साकार करण्यासाठी नगर परिषद आणि पंचायतींच्या निवडणूक प्रचाराला आज सुरुवात झाली. कोपरगाव, अहिल्यानगर येथे नगराध्यक्षपदाचे भाजपा उमेदवार पराग संधान व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या… https://t.co/wJNySlIZTR pic.twitter.com/4GLRD3V8B8
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 24, 2025
आम्ही शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या
आम्ही शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या त्या आजही सुरू आहेत. आम्ही लोकांसोबत राहून त्यांचे परिवर्तन करणारे लोक आहोत. आज विवेक भैया कोल्हे यांनी ‘विश्वासनामा‘ जाहीर केला. हा जाहीरनामा नाही हा ‘विश्वास नामा‘ आहे. त्या विश्वासनाम्याला पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. गटारातील वाहणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे जेणेकरून ते पाणी आपल्या नद्यांमध्ये मिसळणार नाही. आपण त्यासाठी प्रयत्न करत आहोत. प्रत्येक शहरामध्ये पिण्यासाठी मुबलक पाणी मिळाले पाहिजे. त्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अमृत योजना दिली. या योजनेच्या माध्यमातून सर्व निधी तुमच्यापर्यंत पोहोचायचा असेल तर एक पारदर्शी अशा प्रकारची व्यवस्था उभी करावी लागेल. हा निधी पोहोचवायचा असेल तर एक नगरपालिकेत मजबूत सरकार स्थापन करावे लागेल, ज्यात हा येणारा निधी जनतेसाठी वापरणारे लोक असतील, ज्यांच्याकडे विकासाची दृष्टी असेल, असे फडणवीस म्हणाले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, सर्वात आधी लाडक्या बहिणींची आठवण ठेवावी लागते. जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे कोणीच बंद करू शकणार नाही. या निवडणुकीत मी मतदान मागण्याकरिता आलो आहे मी कुणावरही टीका करणार नाही. महाराष्ट्रातील नागरी भागाला कसं विकसित करायचं याची ब्ल्यू प्रिंट आमच्याकडे तयार आहे. विवेक भैय्यांनी मांडलेल्या विश्वासनाम्याला पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे.










