Sanjay Raut Press Conference : पुण्यातील गोळीबाराच्या घटनेवरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांवर निशाणा साधला. पुणे गुन्हेगारीचे माहेरघर बनल्याची टीका करत त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले.
पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या घटनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. गेल्या अडीच ते तीन महिन्यांतील गुन्हेगारीच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. ‘पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जायचे, मात्र आता ते गुन्हेगारीचे माहेरघर बनत चालले आहे,’ अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.
राज्याचे गृहमंत्री नेमके काय करत आहेत?
पुण्यात भरदिवसा न्यायालयाच्या परिसरातच हल्ल्याची घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच मुद्द्यावरून संजय राऊत यांनी राज्याच्या गृहखात्याला लक्ष्य केले. (Objection On Home ministry) पोलीस नेमके काय करत आहेत? गेल्या अडीच ते तीन महिन्यांतील गुन्ह्यांची आकडेवारी पाहिली, तर राज्यातील परिस्थिती चिंताजनक असल्याचा दावा त्यांनी केला.
महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. राज्यात गुन्हेगारीचे साम्राज्य निर्माण होत असल्याची टीकाही राऊत यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी असताना राज्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुंबईतील व्यावसायिकांकडून खंडणी वसूल केली जात असल्याचा आरोप
मुंबईतील व्यावसायिकांनाही खंडणीच्या घटनांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. (Extortion from businesspeople) काही व्यावसायिकांकडून खंडणी मागितली जात आहे. खंडणी देण्यास नकार दिल्यास त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो, अगदी खून होण्याच्या घटनाही घडत असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे राज्यातील व्यापारी आणि व्यावसायिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्या तर आनंदच; संजय राऊतांची भूमिका
दरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडींवर बोलताना संजय राऊत यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवरही प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्या तर आम्हाला आनंदच होईल, असे ते म्हणाले. (Spuria Sule chief ministry)शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका मी स्वतः मांडेन. सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला, तर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहीन, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे.
विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही आत्मपरीक्षण करावे
यावेळी संजय राऊत यांनी विरोधी पक्षातील नेत्यांनाही आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. राज्यातील राजकीय परिस्थिती, विरोधकांची भूमिका आणि सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. पुण्यातील न्यायालयाबाहेरील हल्ल्याच्या घटनेनंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. (opposition parties should also engage in introspection) विरोधकांकडून सरकारवर टीका होत असताना, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन आणि गृहखाते कोणती पावले उचलणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
LS Marathi – महाराष्ट्रातील बातम्या, पर्यटन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा.








