Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • उद्धव ठाकरेंना मोठा झटका! ४५ वर्षे शिवसेनेला साथ दिलेला, एकनिष्ठ शिलेदार शिंदेंनी फोटला
Top News

उद्धव ठाकरेंना मोठा झटका! ४५ वर्षे शिवसेनेला साथ दिलेला, एकनिष्ठ शिलेदार शिंदेंनी फोटला

Rajendra Jhavere joins Shinde Shivsena

एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये शिवसेनेशी बंडाळी केल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली गळती अद्याप थांबलेली नाही. त्यातच आता शिवसेनेशी ४५ वर्षे एकनिष्ठ राहिलेल्या शिलेदाराला फोडण्यात एकनाथ शिंदे यांना यश आलं आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिकेचे नगरराध्य असलेल्या राजेंद्र झावरे यांनी एकनाथ शिंदे याच्या उपस्थितीत आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कोरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि सह संपर्कप्रमुख पदी असलेल्या राजेंद्र झावरे यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झावरे यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचारासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री मैदानात, ‘या’ ४० बड्या नेत्यांची यादी जाहीर

विविध प्रमुख पदाधिकाऱ्याचे पक्षप्रवेश

यावेळी त्यांच्यासह उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, विधानसभा प्रमुख किरण खर्डे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इरफान शेख, उप शहरप्रमुख विकास शर्मा, शेखर कोलते, बाळासाहेब साळुंखे, राहुल देशपांडे, अमजद शेख, सतीश शिंगणे, वैभव गीते, विजय सोनवणे, विजय शिंदे, वर्षाताई शिंगाडे, सलीम कांदेवाले, अरुण बोर्डे, श्रीरामपूरचे दत्तात्रय खेमकार, शिरूरच्या रोहिणी बनकर, सुनील बाफना, किरण बनकर तसेच तळेगाव दाभाडे येथील लीना कामत यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

शिवसेनेत काम करणं शक्य नाही..

राजेंद्र झावरे हे गेल्या 45 वर्षांपासून शिवसेनेत होते. शिंदे गटा प्रवेश केल्यानंतर राजेंद्र झावरे म्हणाले की, ‘मी 45 वर्षांपासून शिवसैनिक आहे. शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख, लोकनियुक्त नगराध्यक्ष, जिल्हा सहसंपर्कप्रमुख अशी विविध पदे सांभाळण्याची संधी मला मिळाली. माझ्या मनात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. परंतु जिल्ह्यातील काही राजकारणामुळे आता शिवसेना पक्षात काम करणे शक्य नाही.’ दरम्यान, राजेंद्र झावरे यांच्या शिवसेना प्रवेशाने कोपरगावमधील राजकारणाला वेगळे वळण मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts