Yellow Alert for Hailstorm : भारतीय हवामान विभागाकडून (India Meteorological Department) राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. राज्यात गारपिटीची (Hailstorm) शक्यता व्यक्त केली आहे. या गारपिटीमुळे शेतीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे आधीच कर्जबाजारीपणामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्याला आणखी एका संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे तो हवालदिल झालाय.
राज्यातील काही भागात ऐन मार्च महिन्यात पाऊस सुरू आहे. राज्यात सतत हवामानात बदल होत आहे. त्याचा फटका शेती पिकाला (Blow to Agricultural Crops) बसत आहे. त्यामुळे या नुकसानीला कशा प्रकारे सामोरे जायचे असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस होंण्याचा अंदाज आहे. तर २० मार्चपर्यंत राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला. केवळ राज्यातच नव्हे तर देशातील अनेक भागातही पाऊस पडत आहे.
हे ही वाचा: दिल्ली हादरली! पालममधील इमारतीला भीषण आग; 9 जणांचा होरपळून मृत्यू, बचावकार्य सुरू
या जिल्ह्यांत होणार गारपीट
सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, रत्नागिरी, रायगड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, हिगोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोदिंया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर येथे ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाने सांगितले आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय.
सांगली शहरासह मिरज तालुक्यात गारपीट
सांगली शहरासह मिरज पूर्व भागामध्ये ही वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. बेडग व आरग सह परिसरात गारांचा तुफानी पाऊस झाला. विजांचा कडकडाट झाला. सांगली जिल्ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे.
हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस
अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे हळद ,गहू उत्पादकांची उडाली धांदल. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अक्कलकोट तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बु. घोळसगाव, बोरगाव गावातील शेतीला गारपीटी फटका बसण्याची शक्यता निर्माण झालीय. तालुक्यातील गहू, ज्वारी आणि द्राक्ष पिकांना याचा मोठा फटका बसणार आहे.
शेतकऱयांनी जगावे कसे?
अनेक शेतकऱयांनी आपल्या शेतीसाठी कर्ज काढले आहे. त्यातच सावकारांचा कर्ज फेडण्यासाठी तगादा लागत आहेत. हवामानाचा सातत्याने फटका बसत असल्याने शेती करावी की नाही, प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे शेती संकटात येण्याची शक्यता निर्माण झालीय. तसेच हाता-तोंडाशी आलेले पीक वाया जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.











