Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • द कपिल शर्मा शोमध्ये जज म्हणून काम करणाऱ्या अर्चना पुरण सिंहला गंभीर आजाराने घेरले; मुलाने दिली माहिती
मनोरंजन

द कपिल शर्मा शोमध्ये जज म्हणून काम करणाऱ्या अर्चना पुरण सिंहला गंभीर आजाराने घेरले; मुलाने दिली माहिती

archana puransingh having serious issue

Archana Puran Singh serious illness : द कपिल शर्मा या रिऍलिटी शो मध्ये जज म्हणून काम करणाऱ्या अर्चना पुरण सिंहला गंभीर आजार झाला आहे. याबाबत त्यांचा मुलगा आयुष्मान सेठी याने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. या कपिल शर्मा शो मध्ये जज म्हणून कार्यरत असलेल्या अर्चना पुरण सिंहला एक दुर्मिळ आजार झाला आहे. या दुर्मिळ आजाराचे नाव कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम असे आहे. 2025 मध्ये एका चित्रपटाच्या सेटवर त्यांच्या मनगटाला छोटोशी दुखापत झाली होती. याच दुखापती नंतर हा आजार वाढला असून त्याचा हातावर कायमस्वरूपी परिणाम झाल्याचे बघायला मिळाले. हि जखम बारी झाल्यानंतर देखील मेंदूला चुकीचे संदेश मिळतात. आणि यामुळे असह्य वेदना आणि सूज येते.

अर्चना पुरण सिंग या कपिल शर्मा शो सोबतच त्यांच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर देखील सक्रिय असतात. त्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून त्यांच्या रोजच्या जीवनातील माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांच्या मुलाने अर्चना पुरण सिंह यांना झालेल्या गंभीर आजार बदल माहिती दिली.

हे ही वाचा : Bigg Boss Season 6 : बिग बॉसमध्ये मेहनतीचा दरवाजाने एंट्री केलेली ती स्पर्धक पहिल्याच टास्कमध्ये झाली फेल

काय होती सोशल मीडिया पोस्ट

मला माझ्या आईवर गर्व आहे. मागील वर्ष माझ्या आईसाठी फार कठीण होते. तिच्या हाताला फॅक्चर झाले होते. आता तिला दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे. CRPS या आजारामुळे माझ्या आईचा हात कधीच पूर्वीसारखा होऊ शकत नाही. असं असताना देखील तिने 2 ते 3 सिनेमांमध्ये काम केले असून एक वेब सिरीज देखील शूट केली. ती एक महिना तर पूर्ण दिवस काम करत होती. परंतु तिने कधीच कोणतीच तक्रार केली नाही. वयाच्या 60 व्य वर्षी तिने युट्युब चॅनेल सुरु करत नवीन गोष्टी ट्राय केल्या. ही एक चांगली गोष्ट आहे.

कोण आहे अर्चना पुरण सिंह

अर्चना पुरण सिंग यांनी मॉडेल म्हणून तिच्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर जलवा , राजा हिंदुस्थानी, मोहोब्बते, कुछ कुछ होता है, यासारख्या सर्व चित्रपटांमध्ये भूमिका बजावर चाहत्यांच्या मनात स्वतःची एक इमेज तयार केली. याशिवाय टेलिव्हिजन मालिकांमध्ये देखील त्यांनी त्यांचे काम चाहत्यांना दाखवून दिले. श्रीमान श्रीमती, जाने भी दो पारो, जुनून असं या मालिकांचे नाव होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts