हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता ज्याने 90 च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते, ते म्हणजे धर्मेंद्र देओल. धर्मेंद्र – हि मन म्हणून ओळखले जातात. अभिनयासोबत त्यांनी शेती, राजकारण या क्षेत्रात देखील त्यांनी त्यांचे अधिराज्य गाजवले. बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र यांचे नुकतेच निधन झाले आहे. याबाबत सोशल मिडियावर दिग्दर्शक करण जोहरने माहिती शेयर केली असून त्यांना अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटिनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
धर्मेंद्र यांनी दोन लग्न केली होती. हे तुम्हाला माहितीच असेल. दोन लग्न झाल्यानंतर देखील धर्मेंद्र या तरुणीच्या प्रेमात पडले होते. धर्मेंद्र हे एका अशा अभिनेत्री वर फिदा झाले होते. ते ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडून त्यांनी लग्न केले होते. त्यानंतर देखील तिसऱ्यांदा धर्मेंद्र हे प्रेमात पडले होते. ती तरुणी होती धर्मेंद्र यांच्या पेक्षाही 26 वर्षांनी लहान. आणि तिचे नाव होते अभिनेत्री अनिता राज. धर्मेंद्र यांची या अभिनेत्रीला प्रत्येक चित्रपटात कास्ट करण्याची इच्छा होती.
नायक धर्मेंद्रचे लव्ह ट्रँगल
90 चे दशक गाजवणारे अभिनेते धर्मेंद्र देओल यांचे लव्ह लाईफ मधील अनेक किस्से हे सर्वानाच माहिती होते. आकर्षक उमदा अभिनेता आणि त्यांचा अभिनय यामुळे अनेक तरुणी त्यांच्या प्रेमात पडायच्या. अभिनय क्षेत्रात काम करत असतानाच धर्मेंद्र हे ड्रीम गर्ल हेमा मालिनीच्या प्रेमात पडले होते.
ते विवाहित असून देखील त्यांनी हेमा मालिनीसोबत लग्न केले होते. त्यांच्या पहिली पत्नीचे नाव प्रकाश कौर होते. तर दुसरी पत्नीचे हेमा मालिनी. या दोन्ही पत्नी असताना देखील धर्मेंद्र हे अनिता राज या अभिनेत्रींच्या प्रेमात पडले होते. दोघेही एजकमेकांवर प्रेम करायचे हि विशेष बाब. धर्मेंद्र आणि अनिता राज यांची जवळीक वाढायला लागल्यावर अनेक दिग्दर्शकांनी नायिका म्हणून अनिता राज ला कास्ट करण्याची शिफारस करायला सुरुवात केली होती.
हे ही वाचा : अभिनेता धर्मेंद्र मनोरंजनासोबतच राजकारणातही होते सक्रिय
या चित्रपटात दोघांनी केले एकत्र काम
अभिनेता धर्मेंद्र यांनी 1981 साली प्रेम गीत या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी 1996 पर्यंत चित्रपटसृष्टीत काम केले. अभिनेत्री अनिता राज आणि धर्मेंद्र यांनी नौकर बीवी का या चित्रपटात एकत्र काम केले. त्यानंतर 1985 मध्ये करिष्मा कुदरत का या चित्रपटात धर्मेंद्र अनिताच्या रोमान्स प्रेक्षकांनी अनुभवला. खास म्हणजे कुंदरत का करिष्मा या चित्रपटात सुनील हिंगोरानी यांनी देखील काम केले होते. 1986 मध्ये अभिनेत्री अनिता राज यांनी सुनील हिंगोरानी यांच्याशी लग्नगाठ बांधली.
सध्या काय करतात अनिता राज
त्यानंतर या अभिनेत्रीने चित्रपट सृष्टीतून ब्रेक घेऊन 2007 या साली थोडी लाईफ थोडी मैजिक या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पुनरागमन केले होते. सध्या हि अभिनेत्री टीव्ही क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी ये रिश्ता क्या कहलात है या मालिकेत काम केले आहे. याशिवाय चार दिन कि चांदणी, यारम, मुद्दा 370 जे अँड के, लफ्जों में प्यार या चित्रपटात देखील त्यांनी काम केले आहे. सध्या 62 वर्षीय अनिता राज फिटनेस फ्रिक म्हणून काम करतात. त्यांचे सोशल मीडियावर व्हिडीओस पाहायला मिळतात.












