Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • धर्मेंद्र यांचं बॉलिवूडमधील ‘एवढं’ मोठं कुटुंब, 2 पत्नी, 6 मुले आणि 13 नातवंडे..
Top News

धर्मेंद्र यांचं बॉलिवूडमधील ‘एवढं’ मोठं कुटुंब, 2 पत्नी, 6 मुले आणि 13 नातवंडे..

dharmendra family
160

बाॅलीवूडचा ‘ही-मॅन’ अभिनेते धमेंद्र यांनी आज ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झालं. धर्मेंद्र यांचा कुंटूंब बॉलिवूडमधील सर्वात मोठं कुटुंब आहे. धर्मेंद्र यांना दोन पत्नी असून 6 मुले आहेत. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचे नावे प्रकाश कौर आहे तर दुसऱ्या पत्नीचे नाव हेमा मालिनी आहे. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना चार मुले तर हेमा मालिनी यांना 2 मुले आहेत. दोन पत्नीकडून त्यांना 6 मुले आहेत. तर 6 मुलांना एकूण 13 मुले आहेत. धर्मेंद्रचा 2 पत्नी, 6 मुले आणि 13 नातवंडे असा मोठा परिवार आहे.

वडिलांची तब्येत नाजूक असल्यापासून त्यांचे 6 लेकर त्यांच्या जवळ होती. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी कायमच प्रसिद्धीपासून दूर राहिल्या. धर्मेंद्र यांनी 1954 मध्ये प्रकाश कौर हिच्याशी पहिलं लग्न केलं. त्यांच्यापासून धर्मेंद्रला चार मुले झाली. सनी देओल, बॉबी देओल, विजेता देओल आणि अजिता देओल अशी त्यांची नावे आहेत.

हेही वाचा – बाॅलिवूडचा ‘ही-मॅन’ धर्मेद्र यांचे निधन, ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

काही महिने आधी धर्मेंद्र यांची मुलगी विजेता पती विवेक गिलसोबत दिल्लीत राहत होते. विजेताचे पती विवेक गिल हे राजमकल होल्डिंग्ज अँड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक आहेत. विवेक आणि विजेता यांचे लग्न 1988 रोजी झालं. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या दोन मुली आहेत. ईशा देओल हिने आई वडिलांप्रमाणेच बॉलिवूडमध्ये काम केलं. मात्र, धर्मेंद्र यांची दुसरी मुलगी चित्रपटांपासून दूर आहे. तिचे नाव अहाना आहे.

बॉबी देओल आणि सनी देओल हे दोघेही बॉलिवूडमध्ये काम करतात. हे दोघे ईशा देओलचे सावत्र भाऊ आहेत. मागील काही दिवसांपासून बॉबी देओल, सनी देओल आणि ईशा देओल यांच्यातील जवळीकता वाढल्याचे बघायला मिळालं. सनी देओल आणि बॉबी देओल यांच्या दोन्ही बहिणी विजेता देओल आणि अजिता देओल या प्रसिद्धीपासून दूर आहेत. धर्मेंद्र यांच्या नातवड्यांनीही बॉलिवूडमध्ये पर्दापण केलं आहे.

धर्मेंद्र यांची ६५ वर्षांची कारकीर्द

त्यांनी 1960 मध्ये “दिल भी तेरा हम भी तेरे” या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर 1961 मध्ये आलेल्या “बॉय फ्रेंड” या चित्रपटात ते सहाय्यक भूमिकेत दिसले. धर्मेंद्र 65 वर्षे अभिनयात सक्रिय राहिले, त्यांनी असंख्य हिट, सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. त्यांनी शोले (1975), चुपके चुपके (1975), सीता और गीता (1972), धरमवीर (1977), फूल और पत्थर (1966), जुगनू (1973), और यादों की बारात (1973) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

धर्मेंद्र यांना मिळालेले पुरस्कार

धर्मेंद्र यांनी मिळालेल्या प्रमुख पुरस्कारांमध्ये 1997 चा फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि 2012 चा पद्दभूषण पुरस्कार यांचा समावेश आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनयासाठी पुरस्कार मिळवले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts