Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • अभिनेता धर्मेंद्र मनोरंजनासोबतच राजकारणातही होते सक्रिय
Top News

अभिनेता धर्मेंद्र मनोरंजनासोबतच राजकारणातही होते सक्रिय

Dharmendra Family Details

Dharmendra political career : हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता ज्याने 90 च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते, ते म्हणजे धर्मेंद्र देओल. धर्मेंद्र – हि मन म्हणून ओळखले जातात. अभिनयासोबत त्यांनी शेती, राजकारण या क्षेत्रात देखील त्यांनी त्यांचे अधिराज्य गाजवले. मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांना सकाळच्या सुमारास ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. अभिनेते धर्मेंद्र यांना अनेक सेलिब्रिटिनी समाज मध्यमांवर श्रद्धांजलि अर्पण केली असून बॉलीवूड क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

धर्मेंद्र देओल यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 साली पंजाब येथील संगरूर जिल्ह्यातील नसराली गावात झाला. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती.
त्यांनी 1960 साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यावेळी त्यांनी दिल भी तेरा हमी भी तेरे या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर फुल और पत्थर, शोले, यादोंकी बारात, सत्यकम, चुपके चुपके यासारख्या 276 चित्रपटातून आपली ओळख निर्माण केली. त्यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आणि त्यांना त्यांच्या दमदार कामगिरीमुळे आणि व्यक्तिरेखेमुळे He Man Of Bollywood हि उपाधी मिळाली.

हे ही वाचा : बाॅलिवूडचा ‘ही-मॅन’ धर्मेद्र यांचे निधन, ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तुम्हाला माहिती आहे का ?

अभिनेता धर्मेंद्र यांनी अभिनयासोबतच राजकारणात देखील प्रवेश केला होता. त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेऊन 2004 मध्ये राजकारणात पदार्पण केले होते.
त्यांनी त्यावेळी भाजपातुन राजस्थानातील बिकानेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी 60 हजारांपेक्षा जास्त मत मिळवून खासदारकी मिळवली होती. त्यांनी भाजपातून निवडून येऊन काँग्रेसच्या रामेश्वर लाल डूडी यांचा पराभव केला होता. परंतु त्यानंतर त्यांनी राजकारणातून माघार घेतली. कारण त्यांना राजकीय वातावरण फारसे मानवले नाही. धर्मेंद्र यांचा जास्तीत जास्त वेळ हा मुंबई येथे जात असल्याने मतदारसंघात दुर्लक्ष होत होते. त्यामुळे त्यांनी 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून राजकारणातून सन्यास घेतला होता. याशिवाय धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयाने देखील राजकीय वर्तुळात नशीब आजमावले होते.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts