Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • धुरंधर सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट; तरण आदर्श यांची पोस्ट
मनोरंजन

धुरंधर सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट; तरण आदर्श यांची पोस्ट

Ranveer Singh starrer Dhurandhar achieves highest box office collection in Hindi cinema

Dhurandhar highest-grossing Hindi film : 5 डिसेंबर 2025 रोजी धुरंधर चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर आता पर्यंत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. चित्रपट प्रदर्शित होऊन आता 5 आठवडे झाले असले तरीही चित्रपटाची चर्चा काही थांबण्याचे नाव घेत नाही. हा चित्रपट 2026 या वर्षात पदार्पण करताच आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला असल्याची माहिती ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे.

आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपटात रणवीर सिंग आणि सारा अर्जुन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यापेक्षा सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे चित्रपटातील खलनायकाची. ही खलनायकाची भूमिका अभिनेता अक्षय खन्ना यांनी साकारली आहे. अक्षय खन्ना यांची चित्रपटातील भूमिका हि प्रत्येकाला आकर्षक करणारी होती. त्यांच्या अभिनयाचैव सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर अनेक विक्रम आपल्या नावावर केले. चित्रपटाने आक्रश कामे देखील केली आहे.

धुरंधर या चित्रपटाने भारतात आतापर्यंत 766.90 कोटी रुपयांची आकर्षक कमाई केली आहे. ट्विटरव तरण आदर्श यांनी पोस्ट करत याबाबत माहिती शेअर केली असून ते म्हणाले कि, धुरंधर 2025 चा अप्रतिम शेवट करून 2026 ची सुरुवात आतापर्यंतचा र्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरण्याचा संकल्प करत आहे. चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर चौथ्या आठवड्यात देखील दुप्पट कमाई केली आहे.

चौथ्या आठवड्यातील कमाई

या पोस्ट मध्ये तरण आदर्श यांनी चित्रपटाची चौथ्या आठवड्यातील कमाई देखील शेअर केली असून चौथ्या आठवड्यात चित्रपटाने 766.90 कोटी रुपयांची कमाई भारतात केली आहे. चौथ्या आठवड्यात धुरंधरने शुक्रवारी 16.70 कोटी, शनिवारी 20.90 कोटी, रविवारी 24.30 कोटी, सोमवारी 11.20 कोटी, मंगळवारी 12.60 कोटी, बुधवारी 12.40 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

हे ही वाचा : नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रभासच्या स्पिरीटचे पहिले पोस्टर रिलीज; प्रभास शर्टलेस अवतारात

धुरंधर पार्ट 2 येणार

धुरंधर चित्रपट हा दोन भागात बनवण्यात आला आहे. धुरंधर चित्रपटाचा पहिला भाग हा 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. तर चित्रपटाचा दुसरा भाग हा 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले असून खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाने चित्रपटात केलेला अभिनय सर्वांना आवडला आहे. सोशल मीडियावर त्याच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक करण्यात आले.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts